AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CNG Rate: सीएनजी कार चालवावी की नाही? सर्वसामान्यांचा संताप… आज पुन्हा इतका वाढला भाव

CNG Rate Hike in Maharashtra: एकीकडे एलपीजीच्या किंमती वाढल्या असतानाच आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एकतरी सीएनजी भरण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. त्यातच आजपासून सीएनजीची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे. किती झाली सीएनजीच्या किंमतीत किती वाढ झाली?

CNG Rate: सीएनजी कार चालवावी की नाही? सर्वसामान्यांचा संताप... आज पुन्हा इतका वाढला भाव
सीएनजीची किंमत वधारलीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 09, 2026 | 10:16 AM
Share

CNG Price Hike in Maharashtra: इंधन दरवाढीची टांगती तलवार असतानाच आता सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. राज्यात सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतकाच जर सीएनजी मिळत असेल तर मग सीएनजी कार घेऊन काय फायदा झाला अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिली आहे. एकतर सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहा आणि पुन्हा अधिक किंमत मोजा याचा वाहनचालकांनी रोष व्यक्त केला आहे. सीएनजी दरवाढीत कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नाशिककरांना महागाईचा झटका

आज सकाळीच नाशिककरांना पुन्हा महागाईचा झटका बसला आहे. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो तब्बल १ रुपया ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ९३ रुपये ६५ पैसे असलेला सीएनजीचा दर आता ९५ रुपये १५ पैसे प्रति किलो झाला आहे. तब्बल एका वर्षानंतर सीएनजीच्या दरात वाढ झाली असून, सीएनजी आणि डिझेलचे दर आता जवळपास समान पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी एकच संताप व्यक्त केला आहे.

रिक्षा चालक, उबेर चालकांची नाराजी

पुणे शहर ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवड शहरातही सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालक आणि ओला उबेर चालक नाराज झाले आहेत. सीएनजी दर वाढत आहेत मात्र आमचे भाडे आहे त्याच दरात आहे दुसरीकडे सातत्याने सीएनजी दरवाढ होत असल्याने व्यवसाय करायचा कसा असा सवाल रिक्षा चालकांनी केला आहे.सीएनजीची दरवाढ झाली असली तरी व्यावसाय करणे भागच आहे असं सांगत रिक्षा चालक ओला-उबेर चालक यांची सीएनजी गॅस स्टेशनवर गर्दी पाहायला मिळत आहे.

मध्यरात्रीपासून CNG च्या दरांमध्ये वाढ

1 किलो मागे तब्बल 1.50 रुपयांची वाढ

पूर्वी 93.65 प्रति किलो

रात्रीपासून CNG दर 95.15 प्रति किलो

एक वर्षानंतर CNG दरांमध्ये झाली वाढ

CNG आणि डिझेलचे दर जवळपास झाले सारखेच

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?