AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | पुणेकरांसाठी पाणी पुरवठ्याची महत्वाची बातमी, यंदा पाणी…

pune water supply news | पुणेकरांच्या पाण्यासाठी महत्वाचा निर्णय झाला आहे. यंदा पुणेकरांना वर्षभर कसा पाणीपुरवठा होणार आहे, त्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना आता जरा जपूनच पाणी....

Pune News | पुणेकरांसाठी पाणी पुरवठ्याची महत्वाची बातमी, यंदा पाणी...
Image Credit source: PTI
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 12, 2023 | 9:01 AM
Share

पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : राज्यात यंदा कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कमी पावसाचा परिणाम आता पुढील आठ महिने जाणवणार आहे. पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर कमी पावसाचा परिणाम होणार आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. परंतु हे पाणी आता पुढील आठ महिने पुरवावे लागणार आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार पाणी मिळाले नाही.

यंदा कमी पाऊस, पाणीपुरवठा कमी होणार

पुणेकरांना वर्षाला 20.90 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली होती. परंतु मनपाची ही मागणी मान्य करण्यात आली नाही. खडकवासला आणि भामा आसखेड धरण प्रकल्पातून केवळ पुणेकरांसाठी 12.82 टीएमसी पाणीसाठा मिळणार आहे. सन 2023-24 या वर्षासाठी पाटबंधारे विभागाकडून हा पाणीसाठा मंजूर करण्यात आला. यामुळे आता मनपाला कमी पाण्यात वर्षभराचे नियोजन करावे लागणार आहे.

पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात शक्य

पाटबंधारे विभागाने पुणे मनपास कमी पाणी मंजूर केले आहे. यामुळे आता मनपाला पुणे शहरातील पाण्यात कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पुणे मनपाने 12.82 टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरल्यास महापालिकेला तीन पट दंडाचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. यामुळे पुणे शहरातील नागरिकांना जपूनच पाणी पुढील आठ महिने वापरावे लागणार आहे.

कधी किती मिळाले पाणी

  • 2018-19 – 19.19 टीएमसी
  • 2019-20 – 20.21 टीएमसी
  • 2020-21- 20.27 टीएमसी
  • 2021-22 – 20.24 टीएमसी
  • 2022-23 – 20.49 टीएमसी
  • 2023024- 12.82 टीएमसी

गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी पाणी

गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी पाणी यंदा मनपाला मिळाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मनपाची पाणी गळती सुमारे 35 टक्के आहे. यामुळे यंदा पुणेकरांना कमी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. गेल्या सहा वर्षांत इतके कमी पाणी पुणे मनपाला कधीच मिळाले नाही. यामुळे मनपाची पाणीपुरठा करताना कसरत होणार आहे.

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...