Mahametro Pune |महामेट्रोचे लकडी पुलावर रखडले काम लवकरच सुरु होणार- महापौर मुरलीधर मोहळ

गणेश मंडळाच्या हट्टामुळे रखडलेल्या मेट्रोच्या कामाचा फटका महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशनला बसत आहे. महामेट्रोला दररोज तब्बल ५६ लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून हे काम थांबले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका बसल्याने मार्ग सुरु होण्यातही अनेक अडचणी येत आहेत.

Mahametro Pune |महामेट्रोचे लकडी पुलावर रखडले काम लवकरच सुरु होणार- महापौर मुरलीधर मोहळ
मुरलीधर मोहोळ (महापौर, पुणे)
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 5:52 PM

पुणे – शहरातील संभाजी पुलावरुन जाणाऱ्या मेट्रो मार्गातील खांबाची उंची वाढवण्याची मागणी गणेश मंडळाकडून करण्यात आली होती. यासाठी मागील तीन महिन्यांपासून थांबलेल्या या कामाला अखेर येत्या दोन -तीन दिवसात सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे. गणेशमंडळांच्या बरोबर याबाबत चर्चा करण्यात आली. इतकंच नव्हेतर गणेश मंडळांनी सुचवलेले पर्याय अव्यवहार्य असून, त्यासाठी मंडळांनी सुचवलेल्या पर्यायामुळं मेट्रोचं तब्बल70 कोटींचा खर्च वाढत असून त्याचबरोबर दोन वर्षांचा कालावधीही वाढणार आहे.

इतक्या लाखाचा  बसतोय भुर्दंड

गणेश मंडळाच्या हट्टामुळे रखडलेल्या मेट्रोच्या कामाचा फटका महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशनला बसत आहे. महामेट्रोला दररोज तब्बल 56 लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून हे काम थांबले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका बसल्याने मार्ग सुरु होण्यातही अनेक अडचणी येत आहेत. मार्गिकेची उंची वाढवायची झाल्यास जवळपास 39 मोठे खांब हलवावे लागतील. कामाचा कालावधी वाढणार आहे. तसेच आर्थिक भुर्दंडही बसणार आहे.

महामंडळांनी मार्गिकेची उंची वाढवण्यासंदर्भातील भूमिका बदलावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास करत असताना सर्वांनी एकत्र यावे असे आवाहनही मोहळ यांनी केले आहे.

Record Break : बीज गुणन केंद्राची किमया : 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

आधी आरोप, आता पोस्ट डिलीट, शरद पोक्षें का भडकले?

Record Break : बीज गुणन केंद्राची किमया : 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन