गळ्यात भगवा गमछा, व्हॉट्सअॅप स्टेट्समधून काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत जाण्याचे स्पष्ट संकेत
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स चर्चेत आले. त्यातूनही पक्ष सोडण्याचे संकेत मिळत आहे. या स्टेट्समध्ये रवींद्र धंगेकर गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो आहे. यामुळे रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

Ravindra Dhangekar: राज्यात शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत अनेक नेते अन् पदाधिकारी शिवसेनेत सहभागी होत आहे. कोकणात शिवसेना उबाठाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला आहे. पुण्यातील काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता शिवसेनेचे बडे नेते उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली.
राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर सक्रिय शिवसेनेकडून काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीसाठी सुरू झाल्या आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उदय सामंत यांची काँग्रेसचे पुण्याचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली. त्यांच्या सुपुत्राच्या आज वाढदिवस असल्याने एकत्र वाढदिवस आहे, असे त्यांनी म्हटले.
धंगेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स चर्चेत
रवींद्र धंगेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स चर्चेत आले. त्यातूनही पक्ष सोडण्याचे संकेत मिळत आहे. या स्टेट्समध्ये रवींद्र धंगेकर गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो आहे. तसेच ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी. तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही…’ हे गाणे सोबत जोडले आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चांना पाठबळ मिळाले आहे.
काँग्रेस नेते मा.आ. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.@DhangekarINC pic.twitter.com/3MGNhkZCGu
— Uday Samant (@samant_uday) February 22, 2025
धंगेकर का आहेत नाराज?
पुणे महानगरपालिकेची येणाऱ्या काळात निवडणूक आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना काही विभाग विभागून दिले आहेत. परंतु त्यात रवींद्र धंगेकर यांचे नाव नाही. रवींद्र धंगेकर यांना डावलल्याची कुजबुज सुरु आहे. त्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले, मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी देणार असतील. त्यामुळे माझे नाव बाजूला ठेवला असेल.
एकनाथ शिंदेच्या भेटीमुळे रवींद्र धंगेकर यांना डावलल का? त्यावर धंगेकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक कामासाठी भेटलो. मी आजही सांगतो आणि उद्याही सांगेल. परवा अजित पवारांना देखील मी भेटलो. मी निरीक्षक म्हणून कधीच काम करत नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. निरीक्षक म्हणून पक्षाचे वरिष्ठ लीडर काम करत असतात. पक्षाला अहवाल देणे इतका मी मोठा नाही. कार्यकर्ता म्हणून माझ्यावरची जबाबदारी देतील ते मी पार पाडेल. मला योग्य वेळी पक्ष योग्य जबाबदारी देईल, असे धंगेकर यांनी म्हटले.
