AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंना आंदोलनाची वेळ येणार नाही; मंत्री विखे पाटलांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच मनोज जरांगेंना आंदोलनाची वेळ येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगेंना आंदोलनाची वेळ येणार नाही; मंत्री विखे पाटलांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा
| Updated on: Jul 31, 2026 | 11:15 AM
Share

मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. जरांगेंनी 29 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. सरकारकडून वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. परंतु मनोज जरांगे यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी तयारी सुरू केल्यानंतर सरकारची धावाधाव सुरू झाली. त्यानंतर आज शुक्रवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची अपडेट दिली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘आम्ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू केली. आंदोलकांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत केली. मृत्यूमुखी पडलेल्या 32 जणांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय झाला. त्यांना महामंडळ, एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याचा निर्णय झाला. बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू केल्या. सारथी संस्थेत यूपीएससी करण्याऱ्यांच्या जागा 400 वर केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटची अंमलबजवणीसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांकडून हेल्पलाइन जारी करण्यात आला आहे. त्यांना प्रत्येक सोमवारी अंमलबजावणीचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. आता जात प्रमाणपत्राची अडचण राहणार नाही, याच्या सूचना दिल्या आहेत’.

महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं की, ‘सरकारने वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीमुळे मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. महाविकास आघाडीच्या काळात काही निर्णय रद्द झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झालं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मोठे निर्णय घेतले. शिंदे समितीने मोठं काम केलं. 58 लाख नोंदी शोधण्याचं काम झालं असून अजूनही काम सुरूच आहे’.

‘शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन कमी पडले नाही. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका घेतली अशी भूमिका आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने घेतली नाही. सरकार अतिशय सकारात्मक आहे. परंतु जरांगेंची भावना योग्य असली तरी त्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

अभिजीत दीपके यांच्यावर भाष्य करताना म्हटलं की, अभिजीत दीपकेंनी त्यांना कोणी धमकी दिली, त्याचं नाव सांगावे. संसदेत विद्यार्थ्यांसाठी कायदा देखील झाला. मात्र काँग्रेस केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची भूमिका योग्य असताना दीपकेंनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. संदिग्धता निर्माण करण्यात अर्थ काय? राजकीय पक्षाकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांचा जनाधार गेलाय, ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताना दिसत आहे’.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा