AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपने राहुरीचा गड राखला, विजयानंतर अक्षय कर्डिले म्हणाले, ‘माझे वडील असते तर…’

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे.

मोठी बातमी! भाजपने राहुरीचा गड राखला, विजयानंतर अक्षय कर्डिले म्हणाले, 'माझे वडील असते तर...'
Akshay KardileImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 04, 2026 | 2:40 PM
Share

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यात अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. अक्षय कर्डिले यांचा सामना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांच्याशी झाला होता. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे.

काय म्हणाले अक्षय कर्डिले?

राहुरी पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर अक्षय कर्डिले यांच्या कार्यकर्यांनी मोठा जल्लोष केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी खांद्यावर उचलून घेत आनंद साजरा केला. या विजयानंतर बोलताना कर्डिले यांनी, ‘आज माझे वडील असते तर खूप आनंद झाला असता. मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांना कधी विसरू शकत नाही. यत्या काळात सर्वांना मदत करणार अशी भावना व्यक्त केली.

सुरुवातीपासून आघाडी

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत अक्षय कर्डिले यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीनंतर त्यांची आघाडी वाढत गेली. अखेर त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा होती. या निवडणुकीत ते विजय मिळवतील असा अंदाज एक्झिट पोलमध्येही वर्तवण्यात आला होता. अखेर आता त्यांचा विजय झाला आहे.

बारामतीतून सुनेत्रा पवार विजयी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून 1 लाख 65 हजार मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आजच्या निकालात हा आकडा खूप मागे टाकला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे बारामतीत कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी