Raigad VIDEO | वृद्धावर मधमाशांचा हल्ला, पोलिसाची चतुराई, फडकं सॅनिटायझरने पेटवून बचाव

| Updated on: Apr 11, 2022 | 1:39 PM

मधमाशांच्या हल्ल्याने त्रस्त झालेल्या वृद्धाची थरारक सुटका करण्यात आली. रायगडमधील कर्जत पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल जयवंत काठे यांनी चतुराई दाखवली.

Raigad VIDEO | वृद्धावर मधमाशांचा हल्ला, पोलिसाची चतुराई, फडकं सॅनिटायझरने पेटवून बचाव
रायगडमध्ये पोलिसाने वृद्धाला मधमाशांच्या हल्ल्यातून वाचवलं
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

रायगड : मधमाशांच्या हल्ल्याने (Honey Bee Attack) त्रस्त झालेल्या वृद्धाची थरारक सुटका करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबलने ज्येष्ठ नागरिकाला मधमाशांच्या हल्ल्यातून वाचवलं. रायगड जिल्ह्यात (Raigad) ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. जयवंत काठे असं पोलिस कॉन्स्टेबलचं नाव आहे. भर रस्त्यात मधमाशांच्या हल्ल्यानंतर वृद्धाने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी काठेंनी बाईकच्या डिकीत असलेलं फडकं सॅनिटायझरच्या मदतीने पेटवलं. त्यानंतर मधमाशांच्या जाचातून वृद्धाची काहीशी सुटका झाली. या बचावकार्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

मधमाशांच्या हल्ल्याने त्रस्त झालेल्या वृद्धाची थरारक सुटका करण्यात आली. रायगडमधील कर्जत पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल जयवंत काठे यांनी चतुराई दाखवली.

पोलिस स्टेशन समोरील रस्त्यातून जाणाऱ्या वृद्धावर मधमाशांनी हल्ला केला. मदतीसाठी त्यांनी आवाज देताच पोलिस स्टेशनमध्ये असलेले जयवंत काठे धावत बाहेर गेले.

सॅनिटायझरने फडकं पेटवलं

काठेंनी बाईकच्या डिकीत असलेलं फडकं आणि सॅनिटायझर यांच्या मदतीने आग पेटवली. वृद्ध व्यक्तीची सुटका करुन त्याला ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आल. त्यांच्या मदतीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Honeybee attack | सिगरेटचा धूर मोहोळापर्यंत, पुण्यात आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांचा हल्ला

गुडघेदुखी दूर करण्यासाठी चक्क मधमाशीला डंक करु द्यायचा? खडसेंची ही थेरेपी एकदा बघाच

दोन मधमाश्यांची चक्रावून सोडणारी कामगिरी, शीतपेय पिण्यासाठीची धडपड एकदा पाहाच