Raigad Landslide | दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांचा मोठा गौप्यस्फोट, ही दुर्घटना खरंच टाळता आली असती, पण…

सर्वसामान्य नागरीक, गरीब माणसांची ही दुनिया आहे की नाही? त्यांच्या जीवाला खरंच काही महत्त्व आहे की नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. इर्शारवाडीच्या गावकऱ्यांनी जे सांगितलंय ते धक्कादायक आहे. हे गाव गेल्या आठ वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करतंय.

Raigad Landslide | दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांचा मोठा गौप्यस्फोट, ही दुर्घटना खरंच टाळता आली असती, पण...
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 7:09 PM

रायगड | 20 जुलै 2023 : खालापूरच्या इर्शारवाडी गावावर दरड कोसळली आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. आख्खं गाव उद्ध्वस्त झालं. दुर्घटनेत खूप कमी गावकरी बचावले आहेत. जे गावकरी बचावले आहेत त्यांचा आक्रोश हा मनाला सुन्न करणारा आहे. ही घटना कोणत्या शब्दांत सांगावी आणि कशी सांगावी? असा प्रश्न आहे. हे सगळं खूप भयानक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्यावर्षी रायगडच्या महाड येथील तळीय गावातदेखील अशी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमुळे देखील संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तळीये, माळीण सारख्या गावांच्या जखमा कधीच भरुन निघणार नाहीत अशा आहेत. असं असताना आता यावर्षीय इर्शारवाडी गावाची दुर्घटना बघायला मिळत आहे.

विशेष म्हणजे जे गावकरी बचावले आहेत त्यांनी तर अतिशय धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन हे डोंगराळ भागात राहणारे नागरीक आणि आदिवासींसाठी कितपत संवेदनशील आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण दुर्घटनेत बचावलेल्या गावकऱ्यांनी आपण 2015 मध्येच पुनर्वसनाची मागणी सरकार आणि प्रशासनाकडे केली होती, असं सांगितलं आहे. सरकार आणि प्रशासनाने त्यावेळी खरंच पुनर्वसनासाठी प्रयत्न केले असते तर आज जो हाहा:कार उडालाय त्यापासून सर्वांचे प्राण वाचू शकले असते, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी झोपड्या बनवलेल्या, पण…

गावकऱ्यांनी डोंगराच्या पायथ्याशी खाली अशा दुर्घटनेपासून वाचण्यासाठी झोपड्यादेखील बनवल्या होत्या, पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या झोपड्या पाडून टाकल्या, अशी माहिती या गावकऱ्यांनी दिली. तसेच आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षित ठिकाणी झोपड्या बनवल्या म्हणून धमकी देखील आल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज खालापूरला जावून इर्शारवाडी गावाला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी नाना पटोले यांच्यासमोर अक्षरश: टाहो फोडला. गावकऱ्यांनी नेमकं काय घडलं? याबाबतचा सर्व घटनाक्रम सांगितला. विशेष म्हणजे संबंधित घटना घडू शकते याची जाणीव गावकऱ्यांना होती. त्यामुळे गावकऱ्यांनी 2015 मध्येच पुनर्वसनाची मागणी केली होती, अशी माहिती त्यांनी नाना पटोले यांना दिली.

गावकरी नेमकं काय म्हणाले?

“आम्ही पुनर्वसनाची मागणी केली होती. आम्ही 2015 मध्ये पुनर्वसनाची मागणी केली होती. गेल्यावर्षी देखील आम्ही खाली झोपड्या बांधल्या होत्या. पण त्या झोपड्या फॉरेस्टवाल्यांनी तोडून टाकल्या”, असं गावकऱ्यांनी नाना पटोले यांना सांगितलं.

“आम्हाला धमक्या यायला लागल्या. तुम्ही कशाला ठाकरे वरती राहा. आम्हाला थेट जातीवरुन बोलायला लागले. आदिवाशींना कोणी काय बोलला की तो गप्प राहतो. त्यामुळे आम्ही गप्प राहिलो. असं वाटतं की आदिवासी ढोर आहेत. त्यांना जंगलात ढोरासारखं जगावं, असं वाटतं लोकांना”, अशा शब्दांत नाना पटोले यांच्यासमोर गावकऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.