Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज

| Updated on: Jun 06, 2023 | 2:34 PM

Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज. शिवप्रेमी संभाजीराजेंच सुद्धा ऐकत नाहीयत.

Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज
raigad shivrajyabhishek 350 sohala
Follow us on

रायगड : किल्ले रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर राज्यभरातून जवळपास अडीच लाख मावळे जमले आहेत. या सोहळ्यासाठी संभाजीराजे सुद्धा रायगडावर उपस्थित आहेत. तारखेनुसार, आज रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. सोहळा संपल्यानंतर आता खाली उतरण्यासाठी रायगडाच्या प्रवेशद्वारांवर शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली आहे.

गर्दी वाढल्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. जास्त गर्दी झाल्यामुळे पोलिसांना किल्ले रायगडावर शिवभक्तांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला.

शिवप्रेमी संभाजीराजेंच ऐकत नाहीयत

खासदार संभाजीराजे अर्ध्या तासापासून शिवभक्तांना शिस्त पाळण्याचे आवाहन करतायत. शिस्तीने रायगडावरुन खाली उतरण्याच ते आवाहन करतायत. पण जमलेले शिवप्रेमी त्यांचं ऐकत नसल्याच चित्र आहे.

संभाजीराजेंनी काय जाहीर केलय?

खाली उतरताना रायगडाच्या प्रवेशद्वारावरील गर्दी पांगवण्याच सध्याच्या घडीला पोलिसांसमोर आव्हान आहे. शेवटचा शिवभक्त गडावरुन खाली उतरत नाही, तो पर्यंत आपण खाली जाणार नाही, असं संभाजीराजेंनी आधीच जाहीर केलय.