भगवे झेंडे, ढोल ताशांचे गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी; रायगडावर निनादत राहिला छत्रपतींचा जयघोष; अवतरला शिवकाल

| Updated on: Jun 12, 2022 | 5:19 PM

जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला किल्ले रायगडावर शिवाजी महाराज छत्रपती झाले. आखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हा महत्त्वपूर्ण सोहळा गेल्या अनेक वर्षापासून किल्ले रायगडावर साजरा केला जातो.

भगवे झेंडे, ढोल ताशांचे गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी; रायगडावर निनादत राहिला छत्रपतींचा जयघोष; अवतरला शिवकाल
पारिंपरिक ढोल, ताशांच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा
Image Credit source: facebbok
Follow us on

रायगडः किल्ले रायगडावर (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrpati Shivaji Maharaj) ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो शिवप्रेमींनी या सोहळ्यादरम्यान जल्लोश साजरा केला. हिंदू धर्मरूढींप्रमाणे विधीवत पूजा, अभिषेक, ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेने नटलेले शिवप्रेमी अशा अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहिले होते. राज्याभिषेक सोहळ्यासाठी पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करुन शिवराज्याभिषेकासाठी (Shivrajyabhishek) उपस्थित असलेल्या शिवभक्तांमुळे रायगडावर वातावरण शिवमय झाले होते.

जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला किल्ले रायगडावर शिवाजी महाराज छत्रपती झाले. आखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हा महत्त्वपूर्ण सोहळा गेल्या अनेक वर्षापासून किल्ले रायगडावर साजरा केला जातो.

शिवराज्याभिषेकासाठी या संस्थांचा पुढाकार

शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गरज रायगड आणि कोकण क्रीडा मित्र मंडळ, महाड, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.

रायगडाच्या राजसदरेवर सोहळा

सकाळी रायगडाच्या राजसदरेवर हा सोहळा साजरा मोठ्या चैतन्यमय वातावरणात झाला. धार्मिक मंत्र घोषत मान्यवरांच्या हस्ते शिवप्रेमींच्या साक्षीने प्रथम सप्त सिंधूचे जल, दूध, फुलं यासोबत सुवर्ण नाण्यांनी शिवप्रतिमेला अभिषेक करण्यात आला. हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. मुंबई, पुणे, डोंबिवली, सातारा, कोल्हापूर महाडसह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्याला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.