महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस, मराठवाड्यासह..
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. शेती पिके संकटात आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाबद्दल अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात दुष्काळाचे सावट आहे.

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस पाठ फिरवेल, असा अंदाज हवामान विभागाचा होता. पण काही भागात पावसाने हजेरी लावली. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विस्कळीत झाला. कबी दाब प्रणाली निवळल्यानंतर गुजरात 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. फक्त मुंबईच नाही तर पुण्यातही पाऊस सुरू आहे. मॉन्सूनच्या पावसाने अनेक भागात पाठ फिरवली. दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच हवामान विभागाने टेन्शन वाढवणारा इशारा दिला. राज्यावर दुष्काळाचे सावट आहे.
मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या गणेशोत्सवची धूम आहे. अनेक दिवसांपासून पावसाची कमी अधिक कोसळत आहे. शुक्रवारी रात्री देखील मुंबईच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, आज सकाळी पवई आणि जबळपासच्या भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात अखेर पावसाने पुनरागमन केले. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, या पावसामुळे ऐन मोक्यावर शेतात उभे असलेल्या धानपिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
अचानक झालेल्या या परिवर्तनामुळे वातावरणातील तापमान खाली आले असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भात पावसाची प्रतिक्षा वाढली आहे. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तापमान 34 ते 35 अंश सेल्सियस पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागानेही काल पावसाबाबत मोठा अंदाज वर्तवला होता. शेती पिके संकटात आहेत, पाऊस म्हणावा तसा कोसळत नाहीये.