Weather Alert : मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, उष्णता कायम राहणार

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजून गर्मी जाणवतं आहे.

Weather Alert : मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, उष्णता कायम राहणार
mumbai rain
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2023 | 3:21 PM

मुंबई : महाराष्ट्रात काही भागात पाऊस (Maharashtra Weather Forecast) झाला आहे, त्यानंतर एक वादळ येऊन गेलं. त्यामुळे सगळी जनता चिंतेत आहे की, मान्सून कुठे गेला. भारतीय हवामान खात्याने (IMD) गुरुवारी एक भविष्यवाणी जाहीर केली होती की, महाराष्ट्र आणि इतर राज्यात २३ जूनपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. मुंबई आणि कोकणमध्ये काही भागात ढगाळ वातावरण अजून तुरळक पाऊस (Weather Alert) होत आहे. देशात वातवरण पूर्णपणे बदललं असून गर्मी अधिक वाढली आहे.

हवामान विभागाने माहिती दिली आहे की, महाराष्ट्रात अधिक गर्मी वाढली आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडासहीत अनेक ठिकाणी वीजेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नंदुरबार आणि जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात होणार पाऊस ?

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि जवळच्या ठिकाणी पाऊस होणार असल्याचं सांगितलं आहे.

या जिल्ह्यात पाऊस होणार नाही ?

सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस होणार नाही. या जिल्ह्यांमध्ये लोकांना तापमानाचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात पावसाची वाट पाहावी लागणार ?

भारतीय हवामान खात्याने १८ जून ते 21 जून या कालावधीमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु या काळात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 23 जूनपासून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.

मान्सून पाऊस कधी सुरु होणार ?

मान्सून विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी सांगितलं की, महाराष्ट्रापासून केरळपर्यंत अरबी समुद्रात दबाव वाढल्यानंतर मान्सून पुढे सरकेल. 18 से 22 जूनपर्यंत पुणे आणि मुंबईमध्ये मान्सून प्रवेश करेल. राज्यात उत्तर भागात आणि विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी वेळ लागेल.