अरे हमका हिंदी आता नही…हिंदीतून प्रश्न विचारताच राज ठाकरेंचं मिश्कील विधान; एकच हशा पिकला; नेमकं काय घडलं?
मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला. परंतु ठाकरेंच्या उत्तराने सगळेच हसले.

मराठीच्या मुद्द्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठीचा मुद्दा अग्रक्रमावर होता. मराठीच्या मुद्द्यावरून भाऊ उद्धव ठाकरेंना साथ दिली. महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेचे 6 उमेदवार निवडून आले. त्यानंतरही मनसेने मराठीचा मुद्दा कायम ठेवला आहे. मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना एका माध्यम प्रतिनिधीने हिंदीतून प्रश्न विचारला. त्यानंतर राज ठाकरेंनी एका वाक्यात हिंदीतून उत्तर दिलं.
मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या 4 तारखेला आयोजित केलेल्या मोर्चाचा मार्ग, वेळ सांगितला. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली नाही. त्यांनी फक्त मोर्चाविषयी माहिती दिली. बाकी सर्व काही 4 तारखेच्या मोर्चाला बोलणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत राजकीय पक्षाचे झेंडे आणू नये, अशाही सूचना देण्यात आल्या. मुंबईतील मोर्चा हा राजकीय पक्षाचा नसल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांनी कार्यकर्त्यांना तिरंगा झेंडा आणावा, असे आवाहन केलं. राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करत मोर्चाला येण्याचं आवाहन केलं.
पत्रकार परिषदेत दोन्ही बंधूंनी राजकीय प्रश्नांना उत्तर देणे कटाक्षाने टाळले. ही परिषद झाल्यानंतर काही पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी पुढे आले. एका पत्रकाराने राज ठाकरे यांना हिंदीतून प्रश्न विचारला. त्यानंतर हमका हिंदी आता नही, असं म्हणत प्रत्युतर दिलं. त्यानंतर उपस्थिताांध्ये एकच हशा पिकला. हिंदी प्रतिक्रियेकरिता पत्रकारांनी विचारल्यानंतर दिलेल्या मिश्कील उत्तराची जोरदार चर्चा होत होत आहे. राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे पुढे आले. त्यानंतर हमारे सांसद है, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना उद्देशून टिप्पणी केली. तर, आदित्य ठाकरेंकडूनही संजय राऊतांवर कोणाचा कुणाशी संपर्क हे तुम्ही सांगा ही टिप्पण्णी केली. ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे परिवारातही मिश्कील चर्चा पाहायला मिळाली.