AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सीएम पदासाठी शिंदेंची किती चाटूगिरी?’ गडांवरील नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरे संतापले

ईव्हीएममधून मतांची चोरी कशी होऊ शकते? याच प्रात्यक्षिक आज मनसेच्या वतीनं दाखवण्यात आलं, यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'सीएम पदासाठी शिंदेंची किती चाटूगिरी?' गडांवरील नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरे संतापले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2025 | 7:48 PM
Share

ईव्हीएम मशिन हॅक कसं होऊ शकतं, ईव्हीएम मशिनच्या मदतीनं आपलं मत आपण ज्याला केलं आहे, त्याला न होता, दुसऱ्याच व्यक्तीला कसं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक आज मनसेच्या वतीनं सादर करण्यात आलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला, तसेच त्यांनी गडांवरील नमो टुरिझम सेंटरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सडकून टिका केली आहे. लोक म्हणतात  राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते ,पण मत मिळत नाही, तर मतं ही अशी चोरली जातात. म्हणून सांगतो मतदार यादी स्वच्छ करा, पण ते ऐकत नाही, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

लोक म्हणतात  राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते ,पण मत मिळत नाही, तर मतं ही अशी चोरली जातात, म्हणून सांगतो मतदार यादी स्वच्छ करा. पण ते ऐकत नाहीत. पाच वर्ष मतदान झाले नाही, अजून एक वर्ष घेऊ नका, पण ते करत नाहीत. तुम्ही कितीही मतदान करा मॅच फिक्स आहे. मागे क्रिकेटमध्ये मॅच फिक्स झाल्यावर त्या प्लेअरला काढून टाकायचे इथे कोणाला काढत नाहीत. हे लोक असेच निवडून येतात, आणि त्यांना पाहिजे तसं वागतात, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आज एका वर्तमान पत्रात बातमी आली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो टुरिझम सेंटर काढत आहेत. मी आताच सांगतो सत्ता असो नसो वर खाली कुठेही बांधलं की फोडून टाकणार. हे खात एकनाथ शिंदेंचं आहे. मुख्यमंत्री पदासाठी एवढी चाटूगिरी सुरु आहे,  शिवाजी महाराजांच्या गडावर मोदींच्या नावाने टुरिझम सेंटर?  पंतप्रधान मोदी यांना देखील हे माहीत नाही, हे सगळं सत्तेतून येत आणि सत्तेतूनच मतांची चोरी होते, म्हणून 1 तारखेचा मोर्चा आहे. दिल्लीत समजलं पाहिजे काय आग पेटली आहे महाराष्ट्रमध्ये,  महाराष्ट्रमध्ये असलेला राग या ठिकाणी दाखवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...