AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात जाती-जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू – श्रीमंत कोकाटेंचा आरोप

राज ठाकरे टिळक, पुरंदरे आणि रामदासांचे समर्थन करतात हा त्यांचा जातीयवाद आहे. येत्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू आहे. म्हणून आमचा त्यांना विरोध आहे.

महाराष्ट्रात जाती-जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू - श्रीमंत कोकाटेंचा आरोप
Shrimant Kokate and Raj ThackerayImage Credit source: TV9
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 03, 2022 | 2:43 PM
Share

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धारसंदर्भात केलेले दावे चुकीचे असल्याचं मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे. इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे(shrimant Kokate) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.  राज ठाकरे इतिहासाची (History)मोडतोड करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचे समर्थन करत आहे. जेम्स लेनच्या पुस्तकाची पार्श्वभूमी बाबासाहेब पुरंदरेंनी तयार केली होती. जेम्स लेन च्या पुस्तकाचं त्यांनी कौतुक केलं होतं. शिवाजी राजेंची बदनामी करणे या कटात ठाकरेंचा देखील हात असल्याचा आरोप श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे.

पक्षाच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरु नये

शिवाजी महाराजांची राजमुद्रा राज ठाकरे वापरतात. राजमुद्रा वापरतात परंतु ते तसे वागत नाहीत.म्हणून त्यावर आमचा आक्षेप आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरु नये. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्यांनी बांधली असं त्यांनी औरंगाबाद मध्ये सांगितलं, ते खोटं आहे. छ्त्रपती संभाजी महाराजांची समाधी छञपती संभाजी राजेंनी बांधली. महात्मा फुले 1869 ला रायगडावर गेले. त्यांनी समाधी शोधून काढली. टिळकांनी समाधीचा एकही दगड बांधल्याची नोंद नाही. राज ठाकरे यांनी इतिहासाचा खून केलाय. लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी विवेकी भूमिका घेतली. समाधीचं बांधकाम टिळकांनी केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे तोंडावर आपटले.

द्वेष निर्माण करून दंगली घडवण्याचा उद्देश

राज ठाकरे टिळक, पुरंदरे आणि रामदासांचे समर्थन करतात हा त्यांचा जातीयवाद आहे. येत्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू आहे. म्हणून आमचा त्यांना विरोध आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...