राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला! दर्शनाला गेलेल्या 9 जणांचा मृत्यू, वाहनांचा चक्काचूर
राजस्थानच्या कोट्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत .

राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. कोटा-उदयपूर हायवेवर शंभूपुरा गावाजवळ भाविकांची कार उभ्या उसलेल्या ट्रकला धडकली. या क्रूझर व्हॅनमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत 9 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तीन कुटुंब स्वतंत्ररित्या वाहनाने खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन केल्यानंतर परतताना रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावर शंभपुरा गावाजवळ घात झाला. अपघात इतका भीषण होता की, 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा थरार पाहून मदत करणारे लोक देखील घाबरून गेले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेत कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.