राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव, सिंदखेड राजात जय जिजाऊंचा जयघोष

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं आज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा 421 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी सूर्योदयावेळी जिजाऊ माँ साहेबांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी जिजाऊ भक्तांनी अभिवादन करत जय जिजाऊ जय शिवरायचा नारा दिला. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी इ.स.1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. त्यामुळेच जिजाऊंच्या जन्मस्थळी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून …

राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव, सिंदखेड राजात जय जिजाऊंचा जयघोष

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं आज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा 421 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी सूर्योदयावेळी जिजाऊ माँ साहेबांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी जिजाऊ भक्तांनी अभिवादन करत जय जिजाऊ जय शिवरायचा नारा दिला. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी इ.स.1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. त्यामुळेच जिजाऊंच्या जन्मस्थळी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त दर्शनासाठी गर्दी करतात.

जिजाऊंचे जन्मस्थानापासून जिजाऊ सृष्टीपर्यंत भव्य मिरवणूकही काढण्यात आली. जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून, या उत्सवासाठी देशभरातील लाखो  जिजाऊ भक्त जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी  येत आहेत.

आज जिजाऊ जयंतीनिमित्त दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि  पुरस्कार वितरण होणार आहे.

यंदाच्या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेचे निर्माते आणि संभाजीराजेंची भूमिका साकारणारे डॉ अमोल कोल्हे हे  उपस्थित राहणार आहेत. तर छत्रपतींचे वारसदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले हे सुद्धा उपस्थित असतील. याशिवाय सर्जिकल स्ट्राईकचे मुख्य सेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना मराठा सेवा संघाचा सर्वोच मानला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *