केंद्रीय मंत्र्याकडून शरद पवार यांना आता थेट एनडीएमध्ये येण्याची ऑफर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएमध्ये येणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्र्यांनी थेट शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट देखील एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारकडून आता लवकरच संसदेमध्ये डिलिमिटेशन बिल सादर केलं जाण्याची शक्यता आहे. या बिलाला देखील राष्ट्रवादी शरद पवार गट पाठिंबा देऊ शकतो, अशी देखील चर्चा आहे. या सर्वांवर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले?
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच पक्ष डिलिमिटेशन बिलाला देखील पाठिंबा देऊ शकतो, अशी देखील चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील डिलिमिटेशन बिलाच्या पाठिंब्याबाबत संकेत दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचे ठरवले, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांनी आता एनडीएसोबत यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांना प्रत्येकी दिडशे कोटी रुपये देण्यात येणार आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता, संजय राऊत यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी त्याला खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत आमच्यासोबत आले तर त्यांना एक कोटी रुपये सुद्धा देणार नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे सौरव दास हे लंडनला जाण्यासाठी निघाले असताना त्यांना विमानतळावरच अडवण्यात आलं, यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, अभिजीत दिपके यांच्या टिकेला देखील यावेळी आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं. अभिजीत दिपके यांनी आता अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आंदोलन करावे, असा टोला आठवले यांनी लगावाला आहे.