VIDEO | जाळीत अडकल्याने पिल्लाची माकडीणीशी ताटातूट, प्राणीमित्राकडून सुटका

माकडाची आई जाळीतून सहीसलामत बाहेर पडली, पण पिल्लाला बाहेर पडता आले नाही. (Ratnagiri Dapoli Monkey Rescue Video)

VIDEO | जाळीत अडकल्याने पिल्लाची माकडीणीशी ताटातूट, प्राणीमित्राकडून सुटका
दापोलीत जाळ्यात अडकलेल्या माकडाच्या पिल्लाची सुटका
| Updated on: Mar 22, 2021 | 12:20 PM

रत्नागिरी : अन्न-पाण्याच्या शोधात आईसोबत आलेले माकडाचे पिल्लू जाळीत अडकलं होतं. प्राणीमित्रांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या पिल्लाला जीवदान मिळाले. या प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. (Ratnagiri Dapoli Monkey Stuck in Trap Rescue Video)

घराच्या छपरावर पिल्लू अडकले

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आडे गावात हा प्रकार घडला. निकेतन नांदगावकर यांच्या घराच्या गच्चीवर जाळी लावण्यात आली होती. घराच्या छपरावरून आपल्या आईसोबत जात असताना माकडाचे पिल्लू जाळीत अडकले.

आई निसटली, पिल्लू जाळीत फसले

माकडाची आई तिथून सहीसलामत बाहेर पडली, पण त्या पिल्लाला बाहेर पडता आले नाही. याबाबत निकेतन नांदगावकर यांनी प्राणीमित्र मोनित बाईत यांना माहिती दिली. त्यांनी तिथे येऊन त्या पिल्लाची जाळीतून सुटका केली.

प्राणीमित्रामुळे पिल्लाची सुटका

जाळीतून पिल्लाची सुखरुप सुटका करुन त्याची आईशी गाठ घालून दिली. जाळ्यातून सुटका होताच त्याची आई पिल्लाजवळ आली आणि त्याला उचलून घेऊन पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात निघून गेली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

वीजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू, ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा, आंघोळ घालून अंत्यसंस्कार

वानराची सर्वात छोटी प्रजाती, इंग्लंडमध्ये पिंग-पोंग बॉल एवढ्या जुळ्या माकडांचा जन्म; वजन केवळ 10 ग्रॅम

(Ratnagiri Dapoli Monkey Stuck in Trap Rescue Video)