व्हेल माशाची उलटीची किंमत इतकी जास्त का? रत्नागिरीत कोट्यवधींची उलटी पोलिसांनी पकडली

व्हेल माशाची उलटीची किंमत इतकी जास्त का? रत्नागिरीत कोट्यवधींची उलटी पोलिसांनी पकडली
सहा कोटी किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीसह उद्यमनगर येथून दोघे ताब्यात

व्हेल माशाची तस्करी होत असल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. संगमेश्वरनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत मोठ्या किमतीची उलटी जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात तस्करी करणारी टोळी सोमवारी रात्री जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

महादेव कांबळे

|

May 18, 2022 | 10:45 PM

रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (whale vomit) तस्करी (Smuggling) करणाऱ्या टोळीतील दोघांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे 6 कोटी रुपये किमंतीचे जवळजवळ पावणेसहा किलो वजनाची उलटी रत्नागिरी (Ratnagiri) शहरानजिकच्या उद्यमनगर चंपक मैदानाजवळ जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लखनौमधील एका व्यक्तीसह एका स्थानिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी महम्मद जाहिर सय्यद महम्मद अत्तार (वय 56, रा. सध्या राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, मूळ लखनौ), हमीब सोलकर (रा. लाला कॉम्प्लेक्स, रत्नागिरी) अशी अटक केलेल्‍या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू करण्यात आला आहे.

रत्नागिरीत मोठ्या किमतीची उलटी जप्त

व्हेल माशाची तस्करी होत असल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. संगमेश्वरनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत मोठ्या किमतीची उलटी जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात तस्करी करणारी टोळी सोमवारी रात्री जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

तस्करी करणारी टोळी जेरबंद

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होत असल्याच्या घटना गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. संगमेश्वरनंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत मोठ्या किमंतीची उलटी जप्त करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात तस्करी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

चंपक मैदानशेजारी सापळा

सोमवारी सायंकाळी उद्यमनगरनजीकच्या चंपक मैदानाजवळ दोघेजण व्हेल माशांच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार होते. त्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चंपक मैदानशेजारी सापळा लावून सोमावारी रात्री साडे साडे आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन दोघेजण घटनास्थळी आले. काही वेळ ते कोणाची तरी वाट पहात थांबले होते. याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये सुमारे पावणेसहा किलो वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीचे सफेद रंगाचे तुकडे आढळून आले. त्यानंतर त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें