रिक्षाचा प्रवास महागला! मीटरप्रमाणेच भाडे आकारा आरटीओने आदेश काढल्यानं गोंधळाचं वातावरण

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने 1 डिसेंबर 2022 पासून रिक्षेच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ नाशिककरांना मान्य नाही तर दुसरीकडे ही भाडेवाढ कमी असून शासनाने आणखी 20 टक्के वाढ करून द्यावी अशी मागणी रिक्षा संघटना करत आहे.

रिक्षाचा प्रवास महागला! मीटरप्रमाणेच भाडे आकारा आरटीओने आदेश काढल्यानं गोंधळाचं वातावरण
Image Credit source: Google
| Updated on: Nov 23, 2022 | 11:02 AM

नाशिक : नाशिकमधील रिक्षा प्रवास आता महागणार आहे. नाशिकमध्ये आता रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच भाडे आकारणी केली जाणार आहे. 1 डिसेंबर पासून रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार प्रवासातील पहिल्या दीड किलोमीटरकरिता 27 रुपये आकारले जाणार आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 18 रुपये प्रवाशांकडून आकारण्याचे आदेशात म्हंटले आहे. याशिवाय रिक्षा चालकांनी रिक्षाचे मीटर पुनःप्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या आहेत. या नियमांचे पालन न केल्यास प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे. शहरात यासाठी प्रादेशिक परिवहन विशेष पथके कार्यरत असणार आहे. या भाडेवाढीवर मात्र रिक्षा चालक नाराजी व्यक्त करत असून आणखी 20 टक्के भाडे वाढ करून द्यावी अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे महागाईने चांगलचं डोकं वर काढलेलं असतांना रिक्षाने प्रवास करतांना भाडेवाढ झाल्याने आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने 1 डिसेंबर 2022 पासून रिक्षेच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या दरानूसार प्रवासातील पहिल्या दिड किलोमीटरसाठी 27 रूपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 18 रुपये प्रवाशांकडून आकारले जातील.

यासोबतच 30 नोव्हेबर पर्यंत सर्व रिक्षाचालकांनी मीटर पुनःप्रमाणीकरण करणे आवश्यक असून 01 डिसेंबर पासून मीटरप्रमाणेच त्यांना भाडे स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात 1 डिसेंबर पासून विशेष मोहीम राबविण्यात येऊन कारवाई केली जाणार आहे.

आधीच महागाईने डोकं वर काढलेल असल्याने ही भाडेवाढ नाशिककरांना मान्य नाही तर दुसरीकडे ही भाडेवाढ कमी असून शासनाने आणखी 20 टक्के वाढ करून द्यावी अशी मागणी रिक्षा संघटना करत आहे.