COVID-19 in Maharashra Updates : कोरोनाची दहशत कायम, देशात12 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात स्थिती काय, किती रुग्ण ?
COVID-19 Updates : 200 मध्ये जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपलरे ाताय पसरायला सुरूवात केली आहे.देशाच्या वेगवेगळ्या भागात कोविड-19 संसर्गाचे नवीन रुग्ण सतत आढळत असून काही जणांचा मृत्यूहा झाला आहे. महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे, किती रुग्णा आढळले, सविस्तर जाणून घेऊया...

2020 साली संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या आणि कामकाज थांबवायला लावणाऱ्या भयानक कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा व्हायला लागला आहे. दररोज नवीन लोक विषाणूच्या नवीन प्रकाराला बळी पडत आहेत. आतापर्यंतच्या नोंदींनुसार, देशाच्या विविध भागात नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 1200 च्या वर गेली आहे. तर कोविड-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोना संसर्गाची सर्वाधिकप्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही परिस्थिती पाहता, सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरसारख्या आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाच्या नवीन प्रकाराने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. दररोज डझनभर नवीन प्रकरणे समोर येत आहेत. हे लक्षात घेऊनच विविध राज्यांनी आरोग्य विभागांना सूचना जारी केल्या आहेत आरोग्य विभागाने रुग्णालयांना सतर्क राहण्यास आणि कोरोनाशी संबंधित वस्तूंचा,( उदा. ऑक्सिजन सिलिंडर) साठा ठेवण्यास आणि त्यांचे मॉनिटरिंग करण्यासही सांगितले आहे. दिल्ली, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत नोंदवली जात आहेत. नवीन संक्रमित रुग्णांची संख्या 1200 पेक्षा जास्त झाल्याने तज्ञांची चिंताही वाढली आहे. दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
महाराष्ट्रात परिस्थिती काय ?
देशभराप्रमाणेच महाराष्ट्रातही कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या नवीन विषाणून आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. दररोज किमान डझनभर नवीन प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही आता 383 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या कोविड साठी महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविड साठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्ण हे पॉझिटिव आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. काही कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या आजारामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, तसेच आपल्या व इतरांच्या सुरक्षेची, तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं आहे.
आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू
कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या बातम्याही समोर येत आहेत. कोविड-19 मुळे आतापर्यंत 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे त्याची तीव्रता आणखी वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काशीमध्येही कोरोनाच्या नवीन प्रकाराने हातपाय पसरल्याचे समोर आले आहे.
केरळ बनलं हॉटस्पॉट
कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे सतत समोर येत आहेत. कोविड-19 च्या नवीन विषाणूमुळे संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत केरळ पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनत आहे. केरळमध्ये आतापर्यंत 400 हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात अिशय सावधानता आणि सतर्कता बाळगली जात आहे.
