
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला पुणे पोलिसांनी खराडी परिसरातून पार्टी करताना रंगेहात पकडले. यादरम्यान काही गंभीर आरोपही करण्यात आली. काही महिला देखील या पार्टीत सहभागी असल्याने प्रकरणाला एक वेगळे वळण लागले. या पार्टीमध्ये दारूसोबतच ड्रग्सचे सेवन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. पार्टीतील एका महिलेकडे पोलिसांना ड्रग्स मिळाले. पती प्रांजल खेवलकर याच्यासाठी रोहिणी खडसे मैदानात उतरल्या. यादरम्यान पुण्यात त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली. पतीवर होणाऱ्या गंभीर आरोपांवर रोहिणी खडसे यांनी बोलणे टाळले आणि योग्यवेळी सर्व प्रश्नांवर उत्तर देईल, असे स्पष्ट म्हटले. कोर्टाकडून प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा देण्यात आला.
रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चाैकशी
यादरम्यानच रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी गेल्या काही तासांपासून चाैकशी सुरू आहे. प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंनाही नोटीस पाठवली होती. रोहिणी खडसेंची दोन तास अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी सध्या सुरू आहे.प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी करण्यात आली.
पतीनंतर रोहिणी खडसे यांच्या अडचणीत वाढ?
रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवण्याचे काम सध्या सुरू आहे. यादरम्यान कार्यालयात चाैकशीसाठी जात असताना माध्यमांशी बोलणे रोहिणी खडसे यांनी टाळले आहे. प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवालात आला असून त्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले की, प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केले नव्हते. त्यानंतर ही नोटीस रोहिणी खडसे यांना पाठवण्यात आली.
रोहिणी खडसे चाैकशीनंतर काय खुलासा करणार याकडे सर्वांच्या नजरा
चाैकशीनंतर रोहिणी खडसे नेमका काय खुलासा करतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. रोहिणी खडसे सध्यातरी या संपूर्ण प्रकरणावर बोलणे टाळताना दिसत आहेत. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधील काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली. यादरम्यानच्या काळात सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांच्यासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर देखील केली.