
Rohit Arya Encounter : गुरुवारी रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीनं पवई येथील आरए स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या 17 मुलांना आणि 2 अन्य लोकांना ओलीस ठेवलं. या घटनेनं राज्यभरात खळबळ माजली आहे. घटनेचा माहिती पोलिसांना कळल्यानंतर दोन – तीन तासांनंतर ओलीस ठेवण्यात आलेल्याची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, राोहित याने स्टुडिओचं रूपांतर एका हाय-टेक ट्रॅपमध्ये केलं. गेल्या काही दिवसांपासून असं कृत्य करण्यासाठी त्याची योजना सुरु होती. ज्यासाठी रोहित याने अनेक गोष्ट घडवून आणल्या होत्या. पण पोलिसांच्या अचूक युक्तीने आणि धाडसी कारवाईने ही घटना संपली आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. तर रोहित आर्यचा गोळी लागल्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित याला काही व्यक्तींसोबत बोलायचं होतं… त्याच्या या अटीमुळे पोलिसांना देखील गोंधळात टाकलं होतं… कारण रोहित असं का करत आहे… याचं कारण स्पष्ट नव्हतं… अखेर मुंबई पोलिसांच्या पथकाने कार्यभार स्टुडिओभोवती सुरक्षा घेरा घातला. जवळजवळ दोन तास सतत रोहित पोलिसांसोबत बोलत होता. पण पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे… याची कल्पनी रोहितला नव्हती…
मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, रोहित याने स्टूडियोच्या खिडक्या आणि दरवाजांना मोशन डिटेक्टर सेंसर लावलं होतं… शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दिशा देखील बदलल्या होत्या… पोलिांनी स्टुडीओमध्ये प्रवेश करु नये यासाठी त्याने सर्व विचारपुर्वक अधीच करुन ठेवलं होतं. यामुळे हे स्पष्ट होते की, त्याने ही योजना आधीच आखली होती आणि स्टुडिओचा वापर नियंत्रण केंद्र म्हणून केला होता.
अखेर पोलिसांनी बाथरुमच्या मार्गाने स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पोलिसांची एक टीम या मार्गे पाठण्यात आली. ज्यामुळे हळूहळू स्टुडिओमध्ये प्रवेश करणं शक्य झालं आणि पोलिसांनी स्टुडिओवर नियंत्रण मिळवलं… या चकमकीदरम्यान, रोहित आर्यला गोळी लागली आणि जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषिक केलं.
मुंबई पोलिसांना आढळले की सर्व मुख्य दरवाजे आणि खिडक्या सेन्सरने सुसज्ज होत्या. कोणताही दरवाजा उघडल्याने हालचालीचा इशारा येऊ शकतो, ज्यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता… चकमकीनंतर स्टुडिओमधील सर्व सेन्सरने निष्क्रिय करण्यात आले आणि मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. रोहित आर्यने इतकी गुंतागुंतीची व्यवस्था का केली आणि त्याचा खरा हेतू काय होता हे आता पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.