Rohit Pawar : माणूस मोठा असावा तर असा..शरद पवारांची भेट घेऊन हॉस्पिटल बाहेर येताच रोहित पवारांचे पहिले शब्द, आत काय घडलं?

Rohit Pawar : राजकारणात बॉडी लँगवेज, अंदाज, लोकांमध्ये असणारी चर्चा यावर धोरणं आखली जात नाहीत. डिलिमिटेशन बिलाला पक्ष पाठिंबा देईल असं दिसतय ते महत्वाचं आहे.

Rohit Pawar : माणूस मोठा असावा तर असा..शरद पवारांची भेट घेऊन हॉस्पिटल बाहेर येताच रोहित पवारांचे पहिले शब्द, आत काय घडलं?
Rohit Pawar
| Updated on: Nov 27, 2026 | 4:47 PM

“काही वेळापूर्वी मी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आलेलो. आदरणीय पवारसाहेबांना भेटलो. प्रतिभा आजी तिथे होत्या. पवारसाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना विचारलं प्रकृती कशी आहे, ते म्हणाले एकदम उत्तम” असं रोहित पवार बोलले. “पुढच्या एक-दोन दिवसात त्यांचा डिस्चार्ज होईल. माझं बोलून झाल्यावर त्यांचा पहिला प्रश्न मला होता, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती कशी आहे? काय अडचणी आहेत? त्यांच्याशी मी चर्चा केली. माणूस मोठा असावा तर असा, स्वत:च्या आरोग्याच्या अडचणी आहेत, रुग्णालयात अॅडमिट आहेत, पण या स्थितीतही शेतकऱ्याला, मजुराला काय अडचणी आहेत हे त्यांनी विचारलं” असं रोहित पवार म्हणाले.

“राजकारणात बॉडी लँगवेज, अंदाज, लोकांमध्ये असणारी चर्चा यावर धोरणं आखली जात नाहीत. डिलिमिटेशन बिलाला पक्ष पाठिंबा देईल असं दिसतय ते महत्वाचं आहे. भारत सरकारची आज कॅबिनेट झाली. त्यांनी काही गोष्टी घेतल्या. 50 टक्के खासदारांची संख्या वाढवली. आमचे सर्व खासदार मसुद्यावर चर्चा करतील. माझा अंदाज आहे, इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र बसतील, चर्चा करतील. मग, संसदेत काय भूमिका घ्यायची ते ठरवलं जाईल” अशी माहिती रोहित पवार यांन दिली.

Loading...

शेवटी काय मांडलं जाणार, हे महत्वाचं

“काँग्रेसची काय भूमिका आहे, सपाची काय भूमिका आहे, द्रमुकने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पण बिलाचा मसुदा न आल्यामुळे खूप काही बोलता येणार नाही. डिलिमिटेशनची एक कमिटी असते. या कमिटीचा अध्यक्ष कोणाला केलं जाणार, इंडिया आघाडीतील पक्षांचं मत आहे की, विरोधी पक्षातली नेत्याला तिथे संधी द्यावी. शेवटी काय मांडलं जाणार, हे महत्वाचं आहे. मतदारसंघ आपल्या म्हणण्यांनुसार फोडणं घातक आहे. कोल्हापुरात गोकुळ मध्ये जे झालं, ते चांगलं होतं असं वाटत नाही. आमच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे यांनी या बाबत स्पष्ट भूमिका मांडतील” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us