Rohit Pawar : कुणीतरी गोड बोलतो म्हणून सगळं..भाजपची पावलं ओळखून पार्थ-जय पवारांना रोहितदादाचा मोलाचा सल्ला

Rohit Pawar : "मागच्यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्याचं नुकसान झालं 35 हजार कोटींचं. मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली 12 हजार कोटींचीय. राहिलेले पैसे गेले कुठे? हा माझा प्रश्न आहे"

Rohit Pawar : कुणीतरी गोड बोलतो म्हणून सगळं..भाजपची पावलं ओळखून पार्थ-जय पवारांना रोहितदादाचा मोलाचा सल्ला
Parth Pawar-Jay Pawar
| Updated on: Nov 06, 2026 | 2:47 PM

अजित पवार गटाचे नेते दिल्लीत जाऊन अमित शाहंना भेटून आले. वेगळ्या हालाचाली सुरु आहेत का? यावर रोहित पवार बोलले आहेत. “त्यांच्या पक्षात हालचाली सुरु असतील. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न भाजपं नक्की करेल. भाजप वापर करताना ते अजितदादांच्या पक्षातील ठराविक नेते आहेत, त्यांचा वापर केल्याशिवाय राहणार नाहीत. मला भिती अशी वाटते की, भाजपने ज्या प्रमाणे रणनिती आखून अजितदादा आणि पवारसाहेबांमध्ये दुरी निर्माण केली. त्या प्रमाणे येत्या काळात मला वाटतं भाजप अजितदादांच्या पक्षातील नेत्यांना हाताशी धरुन ते जय आणि पार्थमध्ये अंतर निर्माण करु शकतात” असा दावा रोहित पवार यांनी केला.

कुटुंब म्हणून तुम्ही त्या दोन भावांना काय सल्ला द्याल, त्यावर रोहित पवार बोलले. “मी त्या दोन भावांना एवढाच सल्ला देईन की, मोठ-मोठे नेते जेव्हा आपल्याशी बोलतात तेव्हा भारी वाटतं. पण त्यामागचा राजकीय हेतू समजून घेणं महत्वाचं आहे. कुणीतरी गोड बोलतो म्हणून सगळं आपल्या बाजूने होतं असं नाही. परिवाराचा विचार करा, प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार करा. महाराष्ट्राचा विचार करा, मग काय तो निर्णय घ्या” असं रोहित पवार बोलले.

Loading...

शेतकऱ्याचं नुकसान झालं 35 हजार कोटींचं

“मागच्यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्याचं नुकसान झालं 35 हजार कोटींचं. मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली 12 हजार कोटींचीय. राहिलेले पैसे गेले कुठे? हा माझा प्रश्न आहे. यंदा दुष्काळाचं संकट आहे. दुष्काळ इतका भीषण आहे की, 50 टक्के पाऊस कमी झाल्याने पीकं उद्धवस्त झाली आहेत. लागोपाठ दोन वर्ष शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे” असं रोहित पवार म्हणाले.

त्यांचा जास्त वेळ राजकारण करण्यात जातोय

“आमची मागणी आहे की हेक्टरी एक लाखाची मदत मिळाली पाहिजे. शेत मजुरांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. त्यांना कुटुंबाप्रमाणे 25 हजार रुपयांची मदत द्या. अशा कुटुंबांना मदत मिळणं गरजेचं आहे. लाडकी बहिण योजना मिळत नाही, आम्हाला वाटतं शेतकऱ्याला मोठी मदत देणं गरजेच आहे. महिला बचत गट, मायक्रोफायनान्सचा प्रश्न गंभीर आहे. कर्ज कसं माफ होईल, व्याज कसं माफ होईल, हे पाहिलं पाहिजे. आज सरकार जे करतय, त्यांचा जास्त वेळ राजकारण करण्यात आणि कमी मदत करण्यात जातोय” असं रोहित पवार म्हणाले.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us