शिक्षक दाम्पत्यांना दिलासा देण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार

बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरवण्याची मागणी रोहित पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ केली.

Rohit Pawar on Teacher Couples Transfer, शिक्षक दाम्पत्यांना दिलासा देण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार

मुंबई : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पती-पत्नींना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शाळांमध्ये रुजू असलेल्या शिक्षक दाम्पत्यांची एकाच जिल्ह्यात बदली करावी, अशी मागणी रोहित पवारांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केली. (Rohit Pawar on Teacher Couples Transfer)

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या 10-15 वर्षांपासून शेकडो किलोमीटर दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही परवड होते, असं रोहित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील तत्कालीन भाजप सरकारने एप्रिल 2017 मध्ये बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीची एका जिल्ह्यात बदली करण्यात अडथळा निर्माण झाला.

याबाबत ग्रामविकासमंत्र्यांची भेट घेऊन रोहित पवारांनी त्यांना निवेदन दिलं. बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरवण्याची मागणी रोहित पवार यांनी केली.

Rohit Pawar on Teacher Couples Transfer

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *