MPSC पेपरफुटीच्या आरोपानंतर पोलिसांनी टाकलं मोठं पाऊल; रोहित पवारांनी सांगितली धक्कादायक माहिती
Rohit pawar : रोहित पवार यांनी एमपीएससी पेपर फुटीवरून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचे सांगितले. तसेच संशयित आरोपी नॉट रिचेबल झाल्याचे समोर आलं आहे.

राज्यात एमपीएससीचा औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपाने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात एका पाठोपाठ धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. कौटिल्य अकॅडमीच्या संचालकाने हा पेपर पालकांना विकल्याचा दावा करण्यात येत होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या आरोपानंतर कौटिल्य अकॅडमीचा संचालक नॉट रिचेबल झाल्याचे समोर आलं आहे. तर मुंबईच पथक तपासाठी नंदुरबारमध्ये पोहोचलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणात तक्रारदार आणि उमेदवार विद्यार्थिनीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. आता लवकरच अधिक पुराव्यानिशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार रोहित पवार म्हणाले, ‘ सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडेही आला आहे. भाजपचं सरकार आलं, तेव्हापासून वेगवेगळे फुटले आहेत. पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या 15 विभागाचे पेपर फुटल्याचे दाखवले. सीईटीचाही पेपर फुटत असले, तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. भाजपने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन हाती घेतलं आहे. भाजपचं सरकार नसलेल्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. दुसरीकडे आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात येऊन आंदोलन केलं पाहिजे. आजची तशी परिस्थिती आहे. सीईटीत आम्ही लक्ष घालणार आहोत. त्याचबरोबर एमपीएससीचा पेपर फुटला. त्याचे पुरावे आम्ही दिले आहेत. त्याचा शोध सुरू झाला आहे. ऋषिकेश गांगर्डे नावाचे विद्यार्थी आहेत, त्यांना आज पोलिसांनी बोलावलं आहे. ज्याचे गुण वाढले आहेत. त्या उमेदवारालाही पोलिसांनी बोलावलं आहे. हे सर्व काही चालू आहे, हे सर्व दुर्दैवी आहे’.
चुरूचुरू बोलणारा प्रवाणी पाटील नॉट रिचेबल
‘गृहखात्याकडून माहिती सांगितली जात असेल, तर तुमच्याकडे माहिती आलेली नाही. आम्ही सर्व माहिती एमपीएससीला दिली आहे. त्यांनी ही माहिती गृहखात्याला दिली आहे. आम्ही संध्याकाळी एमपीएससीने गृहखात्याला ही माहिती दिली. आता एवढं कसं जलद झालं. त्यांनी आधी चौकशी झाली पाहिजे. आता तुम्ही बोलावयाला सुरुवात केली आहे. गृहखात्यात कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हे स्पष्टपणे म्हणता येईल. पुरावे आम्ही दिले आहेत. याचं फोरेन्सिक ऑडिट होणे महत्वाचे आहेत. ज्यांची नावे दिली आहेत, त्यांचे चॅट्स पुन्हा मिळवले पाहिजे. सकाळपर्यंत चुरूचुरू बोलणारा पाटील आता नॉट रिचेबल झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या फोननंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. व्हाट्सॅप चॅट मिळत नाही, तोपर्यंत किती जणांपर्यंत पेपर गेला होता, हे कळणार नाही. पारदर्शकपणे हा तपास होईल. यात आम्हाला राजकारण करायचं नाही. ही संस्था चांगली आहे. पैसे देऊन उमेदवार अधिकारी होत असतील, तर लोकांच्या समस्या वाढू शकतील. काही विद्यार्थ्यांना वाढवून आल्याचा आरोप आहे. आमच्याकडे जी माहिती आलेली आहे, ती मोघम आलेली आहे. जोवर खोलात जाऊन माहिती आम्ही घेत नाही. तोवर अधिक पुराव्यांशी बोलणार नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र पुरोगामी राज्य, पण गुन्हे मागे घेण्यासाठी करावा लागतोय पाठपुरावा – रोहित पवार
सीजेपी आंदोलन प्रकरणी पोलिसांत दाखल गुन्ह्यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. ‘आम्ही पोलीस महासंचलकांना भेटलो. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून गुन्हे दाखल मागे घेण्याची विनंती केली आहे. १५०० जवळपास गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. तिथ गुन्हे मागे घ्यायला आम्हाला एवढा पाठपुरावा करावा लागत आहे. बिहारने मात्र नोटिफिकेशन काढलं आहे’.
आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार – रोहित पवार
रोहित पवारांनी प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीवरही भाष्य केलं. रोहित पवार म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटले. त्यांनी युवा वर्गावर होणारा अन्याय मांडला आहे. सुप्रिया सुळे या अमित शाह यांना भेटल्या. १० ऑगस्टला दिल्लीत रिसेप्शन होणार आहे. त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत. शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत. आमच्याकडील बहुतांश लढाईला तयार आहेत. मी लोकांसोबत विचारांसोबत राहिले आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. मी एनडीएसोबत जाणार नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले. रस्त्यावर खड्ड्यांबाबत म्हणाले, ‘ खड्डे खोल पडले आहेत त्यामुळे अडचणी वाढल्या आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले आहेत. याविरोधात मी आवाज उठवणार आहे. रस्त्यावरची लढाई लढणार आहे’.