Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांना राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का, थेट भावाचाच पराभव

Rupali Chakankar: नाशिक येथील भोंदूबाबा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे नाव येतात सर्वत्र खळबळ माजली. त्यांना राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजिनामा द्यावा लागला. त्यानंतर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजिनामा द्यावा लागला. आता रुपाली चाकणकर यांच्या भावाचा देखील पराभव झाल्याचे समोर आले आहे.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांना राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का, थेट भावाचाच पराभव
Rupali Chakankar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 29, 2026 | 1:22 PM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर येथे झालेल्या अत्यंत चुरशीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत चाकणकर यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे यांचा पराभव झाला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

चुरशीची लढत आणि निकाल

नांदूर ग्रामपंचायतीची निवडणूक रुपाली चाकणकर आणि त्यांच्या समर्थकांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत सरपंचपदासाठी संतोष बोराटे रिंगणात होते. मात्र, त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या विशाल थोरात यांनी त्यांचा दारूण पराभव केला. थोरात यांनी बोराटे यांचा 304 मतांच्या फरकाने पराभव करत सरपंचपदाची खुर्ची काबीज केली आहे.

प्रतिष्ठेच्या लढतीत हार

गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावर नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अनेक आरोप झाले. त्यांना राज्य महिला आयोग पदाचा राजिनामा द्यावा लागल्या. त्यानंतर आता आपल्याच गावात आणि त्यातही स्वतःच्या भावाला निवडून आणण्यात त्यांना अपयश आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. ही निवडणूक स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि राजकीय गणितांमुळे गाजली होती.

पराभवाची कारणे आणि परिणाम

नांदूरमधील हा पराभव चाकणकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठा धक्का मानला जात आहे. विशाल थोरात यांनी केलेल्या तगड्या नियोजनासमोर संतोष बोराटे यांचे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून येत आहे. या निकालाचा परिणाम आगामी निवडणुकांवर आणि तालुक्यातील राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us