AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातला मी गुरू मानलं होतं, पण मला… राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचे धक्कादायक विधान

Rupali Chakankar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांनी अशोक खरातबाबत मोठे विधान केले आहे.

अशोक खरातला मी गुरू मानलं होतं, पण मला... राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांचे धक्कादायक विधान
Chakankar and KharatImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 20, 2026 | 10:59 PM
Share

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे समोर आले आहेत. त्याला एका महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

मी अशोक खरातला गुरू मानलं होतं – रुपाली चाकणकर

राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी म्हटले की, ‘खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबाने गुरू मानलं होते, त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रमांना हजर रहायचो. मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाद्यपुजा केली होती, माझ्या पतीनेही पूजा केली, हा 6 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होता. आज सोबत असलेले लोक पुढे कसे वागतील हे आपल्याला माहिती नसतं. माहिती समजताच मला धक्का बसला.

आरोपीवर कठोर कारवाई करावी – चाकणकर

पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, ‘पोलिसांनी खोलवर तपास करावा हे मी सांगितले आहे. मी पोलिस महासंचालकांची भेट घेतली आहे, त्यांनी तपासाबाबत पत्र दिलं आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनाही पत्र दिलं आहे. मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे. मी अध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला होता पण खरातची दुसरी बाजू माहिती नव्हती. जे काही घडलं आहे ते अतिशय चुकीचं आणि घाणेरडं कृत्य आहे. त्याच कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी सखोल तपास करावा, पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे.’

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलं?

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी