
पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असताना पुणे पोलिसंनी छापेमारी केली आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला अटक केली. प्रांजल खेवलकर आणि या प्रकरणातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. खेवलकरच्या जामिनासाठी कोर्टात अजून अर्ज दाखल करण्यात आला नाहीये. पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी या पार्टीबद्दल आपण माहिती शरद पवारांना दिल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय योग्यवेळी टीका करणाऱ्यांना उत्तर देण्याचेही त्यांनी म्हटले.
आता काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात अतिशय धक्कादायक खुलासे केली. खेवलकरच्या मोबाईलमध्ये काय काय भेटले, याचा पाढाच त्यांनी यावेळी वाचून दाखवला. धक्कादायक व्हिडीओ आणि मुलींच्या अत्याचाराची व्हिडीओ सापडल्याचे त्यांनी म्हटले. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी थेट रूपाली चाकणकरांवर भाष्य केले.
आता यावर रूपाली पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडली आहेत. रूपाली पाटील यांनी म्हटले की, कालच्या पत्रकार परिषदेत नवीन काहीही नव्हत. या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर पोलिसांनी मांडल्या होत्या. काल यात नवीन काहीही नव्हत. राज्य महिला आयोग काय तपास अधिकारी नाहीत, असेही त्यांनी म्हटले. त्यांच काम आहे लोकांना समुपदेशन करणे, योजना पोहोचवणे, काही घटना झाली असेल तर घटनास्थळावर जाणे.
पुढे बोलताना रूपाली पाटील यांनी म्हटले, राज्य महिला आयोग काय तपास अधिकारी नाही. कोर्टाने सगळ्या बाजू ऐकूनच न्यालयायने निकाल दिला आहे. मात्र, जर कोणी पीडित असेल तर त्यांनी तक्रार करावी पोलिस तपास करतील. अश्लील काही असेल तर कारवाई करावी. मात्र, झालेली घटना संमतीने आहे का हे पण पाहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी बोलताना थेट म्हटले आहे.
रोहिणी खडसे आणि रूपाली चाकणकर यांच्या वादाचा हा परिणाम असू शकतो, अशीही शंका यावेळी रूपाली पाटील यांनी वर्तवली आहे. मात्र, रोहिणी खडसेच अधिक सांगू शकतील, असेही रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. आता रोहिणी खडसे या रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वादावर काय बोलणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. रोहिणी खडसे आणि रूपाली चाकणकर या दोघी कायमच एकमेकींवर टीका करताना दिसतात.