AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : महापौरांनी 10 लाखांचं आश्वासन दिलं पण… मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांचा मोठा आरोप

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत जीव गमावलेल्या असलम शेख यांच्या कुटुंबाला घोषित केलेली १० लाखांची मदत एक महिना उलटूनही मिळालेली नाही. महापौर रितू तावडे यांनी केलेल्या घोषणेनंतर पाठपुरावा न झाल्याने कुटुंब हवालदिल आहे. विरोधक, विशेषतः किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका करत तातडीने मदतीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या घोषणेतील पोकळपणा उघड झाला आहे.

Mumbai News : महापौरांनी 10 लाखांचं आश्वासन दिलं पण... मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांचा मोठा आरोप
मॅनहोल दुर्घटनेवरून विरोधकांचा महापौरांवर हल्लाबोल
| Updated on: Aug 04, 2026 | 9:40 AM
Share

महिन्याभरापूर्वी साकीनाक येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एकच खळबल माजली. मुंबईतील उघड्या मॅनहोलमुळे, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. यामुळे प्परचंड गदारोळ झाला, प्रशासनाला विरोधकांसह अनेकांनी प्रश्न विचारले. मॅनहोल दुर्घटनेप्रकरणात यांनी चार अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती महापौर रितू तकावडे यांनी दिली. तसेच मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र 2 जुलै रोजी झालेल्या या दुर्घटनेला 1 महीना उलटून गेल्यावरही पीडित कुटुंबियांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेख कुटुंब हवालदिल झाले असून याच मुद्यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. घोषणेनंतर महापौरांकडून कोणताही पाठपुरावा नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही यावरून टीकास्त्र सोडलं आहे. मृताच्या कुटंबियांना भरपाई म्हणून पैसे देण्याची घोषणा केली, मात्र पाठपुरावा कधी ? असा सवाल पेडणेकर यांनी विचारला. खासगी पीएच्या मानधनाच्या मुद्याचा पाठपुरावा होतो, मग सामान्य जनतेला भरपाई का मिळत नाहीस असं म्हणत त्यांनी सडकून टीका केली.

काय आहे प्रकरण ?

2 जुलै रोजी साकीनाका येथे एक दुर्घटना घडली. अस्लम इसाक शेख हे साकीनाका येथील यादव नगरातील रहिवासी तेथून जात असताना ते उघड्या मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रायव्हेट कंत्राटदाराने या मॅनहोलचे झाकण रिपेअर करताना उघडेच ठेवलं होतं, असं उघडकीस आलं. सन्मान हॉटेल आणि एस.जे. स्टुडिओ या दरम्यान हा अपघात घडला आहे. या दुर्घटचनेमुळे मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली तसेच प्रशासनाविरोधात संतापही व्यक्त झाला. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हायला हवी होती लोकांचा हकनाक जीव जातो, असी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली. त्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एल वॉर्डच्या चार अधिकाऱ्यांना या प्रकरणात जबाबदार धरुन त्यांचे निलंबन केलं. तसंच या प्रकरणात मृत्यू पावलेले, अस्लम शेख यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत पालिकेने जाहीर केली.

महीना उलटूनही मदत नाही

मात्र 2 जुलैच्या या दुर्घटनेला महीना उलटून गेला. आज 4 ऑगस्ट उजाडलाय. तरीही मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळीालेली नाही. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीची घोषणा केली होती. मात्र 10 लाखांची मदत अजूनही मिळाली नाही, घोषणेनंतर महापौरांकडून कोणताही पाठपुरावा करण्यात आला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी लावला आहे. दुर्घटनेचा चौकशी अहवालही अद्याप जाहीर झालेला नाही.

यावरूनच विरोधकांनी महापौरावर टीकास्त्र सोडलं असून किशोरी पेडणेकर याही संतापल्या. आम्ही नुकसानभरपाई देई, पैसे देऊ अशी घोषणा महापौरांनी केली मात्र पाठपुरावा कधी ? असा सवाल त्यांनी विचारला. एकतर खासगी पीए असता कामा नये, तोही असेलच तर स्वत: पैसे द्यावेत, करदात्यांच्या मेहनतीचे पैसे का त्यावर खर्च करायचे असं विचारत, पर्सनल पीए च्या मानधनाचा पाठपुरावा होतो, मग मृतांच्या कुटुंबियांना, जाहीर केलेली मदत का मिलत नाही, असं म्हणत पेडणेकर यांनी कडक शब्दात सडकून टीका केली. एकंदपच हे प्रकरण चांगलंच तापणार असल्याचं चित्र दिसतंय .

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश