AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी, ‘६ जून ऐवजी…’

Sambhaji Bhide: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा केला जातो. परंतु तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला येतो. याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी मोठी मागणी केली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी, '६ जून ऐवजी...'
Sambhaji BhideImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 23, 2025 | 11:45 AM
Share

Shivrajyabhishek Din: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महत्वाची मागणी केली आहे. शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करु नये. त्या दिवशी साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे. तसेच तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा केला पाहिजे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो. त्याप्रमाणे शिवराज्याभिषक सोहळा साजरा करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली. आपण अजून ब्रिटिशांच्या प्रथेप्रमाणे तारखेनुसार उत्सव साजरा करतो. हे उत्सव तिथीप्रमाणे साजरे करावे. तसेच रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात येऊ नये, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

संभाजी राजे यांचा विरोध का?

रायगडावर असलेले वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला होता. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही, असे संभाजी राजे यांनी म्हटले होते. त्यांच्या या मागणीला संभाजी भिडे यांनी विरोध केला होता. त्यामुळे हा वाद काही दिवसांपूर्वी चांगला रंगला होता.

वाघ्या कुत्राचा वाद काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर वाघ्या या पाळीव कुत्र्याने त्यांच्या समाधीत उडी घेतल्याचे म्हटले जाते. परंतु याबाबत इतिहास तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. त्याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. काही जण ही दंतकथा असल्याचे सांगतात. त्यामुळे संभाजी राजे यांनी या वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली होती. धनगर समाजाकडून वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्यास विरोध केला जात आहे. या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पासाठी 1906 मध्ये इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी देणगी दिली होती.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!