AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली, मराठा समाजाने ईडब्लूएसचं आरक्षण घ्यावं : संभाजी ब्रिगेड

"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची दिशाभूल केलीय", अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली (Sambhaji Brigade chief Praveen Gaikwad slams BJP).

देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली, मराठा समाजाने ईडब्लूएसचं आरक्षण घ्यावं : संभाजी ब्रिगेड
| Updated on: Feb 07, 2021 | 5:07 PM
Share

रत्नागिरी : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची दिशाभूल केलीय. 50 टक्के आरक्षणामध्ये ओबीसी समाजाला केवळ 19 टक्केच आरक्षण मिळतं आणि या 19 टक्क्यांमध्ये जर मराठा समाजाला समाविष्ट केलं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल. कुठलाही राजकीय पक्ष 50 टक्के आरक्षणाचं समर्थन करत नाही. त्यामुळे ईडब्लूएसचं आरक्षण मराठा समाजाने घ्यावे”, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली. चिपळूनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Sambhaji Brigade chief Praveen Gaikwad slams BJP).

“मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकाने मराठा समाजाची दिशाभूल केली. भाजपने मराठी आंदोलनाचं केवळ राजकारणच केलं. ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण होईल, असं भाजपने बघितलं. संभाजी ब्रिगेडने ईडब्लूएसचं आरक्षण मिळावं, अशी मागणी केलीय. एसीबीएसचा कायदा राज्य सरकार करतेय. पण तो अधिकार राज्य सरकारला नाही. ओबीसींचा आयोग केवळ शिफारस करु शंकतं”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले (Sambhaji Brigade chief Praveen Gaikwad slams BJP).

“शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांच जोरदार आंदोलन सुरु आहे. भाजप सरकार हे केवळ शेतकरी विरोधी नाही तर मानवता विरोधी आहे. भाजपने व्यापार-उद्योगाला पोषक आणि जागतिकरणाच्या तरतुदीप्रमाणे कायदे तयार केलेत. लोकशाहीत लोकांना जर हे कायदे नको असतील तर या कायद्यांसाठी अट्टाहास का?”, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला.

“शेतकऱ्यांच्या बाजूने संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल आणि संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने सरकारला येत्या काही दिवसात उत्तर देईल”, असा सूचक इशारा प्रवीण गायकवाड यांनी केंद्र सरकारला दिला.

मराठा आरक्षणाचा खटला पुढे ढकलला

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती. आता थेट 8 मार्चपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. 8 ते 10 मार्चला विरोधक आपली बाजू मांडणार आहेत. तर 12 ते 17 मार्चदरम्यान राज्य सरकार आपली मांडणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाची तारीख वारंवार पुढे ढकलल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार मजबुतीने उभं : छगन भुजबळ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.