मारहाण, अंगभर चटके अन् शोल्डर गगने… महिलेसोबत सासरच्यांनी केलं चीड आणणारं कृत्य; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका विवाहितेचा तिच्या सासरच्या मंडळींकडून अमानुष छळ करण्यात आलाय.

| Updated on: Jun 01, 2025 | 7:26 PM
1 / 5
सध्या राज्यभरात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. सासरच्या मंडळींनी अतोनात छळ केल्यामुळे शेवटी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तिच्या लग्नात हुंडा म्हणून तब्बल फॉर्च्यूनर कार, 51 तोळे सोनं दिलं होतं. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
दरम्यान, एकीकडे हे प्रकरण राज्यभर गाजलेले असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका विवाहितेला मारहाण झाली आहे. विशेष म्हणजे तिला चटकेही देण्यात आलेयत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
या विवाहितेचा सासू-सासरे, दीर, नणंद आणि पती यांनी छळ केला आहे. या महिलेला बांधून शोल्डर गनच्या सहाय्याने चटके देण्यात आलेयत. माहेरी जाऊन पैसे घेऊन ये, असा धोशा या महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी लावला होता. हा सर्व प्रकार महिलेने आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांत तक्रार केली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे. पीडित महिलेच्या वडिलांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
या महिलेचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमध्ये महिलेच्या अंगावर जखमा दिसत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)