मदरशांवर थेट बुलडोजरच… भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक विधान, बिलोली पोलीस स्टेशनमध्ये घडलं काय?
T Raja on Madrasas: नेहमीच आपल्या आक्रमक भाषणांमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे तेलंगणातील या बड्या नेत्याने काल नांदेडमध्ये मोठे विधान केले. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी मंत्री नितेश राणेंचेही समर्थन केले आहे.

T Raja Statement Bulldozers on Madrasas: आक्रमक भाषणासाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांनी नांदेडमध्ये पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले. काल रात्री झालेल्या सभेत त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली. त्याची दखल पोलिसांनी सुद्धा घेतली. त्यांनी नांदेडमधील सभेत मदरशांबाबात विधान केले. राज्यातील अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे. त्यांनी नितेश राणे यांच्या अनधिकृत मदरसे बंद करण्याच्या मागणीलाही पाठिंबा दिला.
अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवा
महाराष्ट्रातील सगळे मदरसे बंद करा. मदरशांमध्ये देश विघातक शिक्षण दिले जाते, असे मदरसे बंद करा. अनधिकृत मदरसे बंद करण्यापेक्षा उद्ध्वस्त करा. आपल्या महाराष्ट्रात अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची गरज आहे. दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब अशाच मदरशातून तयार झाले आहेत. हिंदूंची हत्या करा असे मदरशांमध्ये शिकवले जाते. नितेश राणे यांना विनंती आहे की ते जे बोलले, त्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी. टी राजा यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बिलोली पोलीस ठाण्याची नोटीस
टी राजा यांच्या विधानाविरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 कायद्याच्या कलम 168 नुसार टी राजाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील याचिका क्रमांक 401/2026 नुसार 28 मार्च 2026 रोजी बिलोली इथं सभा घेण्यास अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली होती. पण या सभेतील भाषण पाहता, त्यातील शब्द पाहता टी राजा यांनी शांतता, धार्मिक सौहार्दाचे उल्लंघन केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. नोटीस बजावल्यानंतर निर्धारीत वेळेत पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पोलीस स्टेशनची नोटीस
शशिकांत शिंदेंची टीका
दरम्यान टी. राजा यांच्या बिलोलीतील सभेवर शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी टीका केली. सरकार भाजपच आहे राज्यात तर त्यांनी ही आशा पद्धतीच वक्तृत्व करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे जावे आणि निर्णय घ्यावा असा टोला त्यांनी लगावला.