हिंगोलीची जागा आम्हीच लढवणार…; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

Sanjay Shisat on Hingoli Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरु आहे. अशात काही जागांवर अद्यापही तिढा असल्याचं पाहायला मिळतंय. अशात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. वाचा सविस्तर...

हिंगोलीची जागा आम्हीच लढवणार...; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 3:55 PM

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांचा जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. हिंगोली आणि नांदेडच्या जागेवर महायुतीत तिढा असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावर शिवसेना शिंदेगटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंगोलीची जागा शिवसेनेची आहे. ती आम्हीच लढवणार आहोत. नांदेडची जागा भाजपची आहे. ती त्यांना दिली आहे. उमेदवार बदल्याचा की नाही हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. पक्षाचा मुख्यनेता जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं संजय शिरसाट म्हणाले.

जागावाटपावर काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपावर त्यांनी भाष्य केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी काही टप्प्याचे काही दिवस बाकी आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची गर्दी धावपळ संपेल. महायुतीत सर्व जागांवर बोलणी झाली आहे. एक दोन जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर  निर्णय होईल. सर्व उमेदवार एक दोन दिवसात घोषित होतील, असं शिरसाट म्हणाले.

हेमंत गोडसे ठाकरे गटात जाणार?

नाशिकचे शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. काहीवेळा आधी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. गोडसे ठाकरे गटात येणार असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. गोडसे यांनी ती जागा दोन वेळेस जिंकली आहे. त्या जागेसाठी आम्ही आजही आग्रही आहोत आणि उद्याही आग्रही असणार आहोत. लवकरच याबाबत निर्णय होईल. कोल्हापूर उमेदवार बदलणार नाही, असं चित्र आहे. इतर पक्षाला जाणार नाही हे स्पष्ट आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

भाजपने शिवसेनेला मराठवाडा अडचणी आणलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व नेत्यांनी ठरवून परभणीची जागा महादेव जानकर यांना जागा दिली आहे. इतर जागांची बोलणी झाली नाही. हिंगोली आमची आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा ही आधीपासून आमच्याकडे असल्याने ती आम्ही लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रश्न नाही, असं शिरसाट म्हणाले.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....