Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्मेश पाटील यांचं माहिती नाही पण ‘हा’ आमच्याकडे कमबॅक करणार; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा

Sushma Andhare on Unmesh Patil May Be Inter in Shivsena Uddhav Tackeray : उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा, पाटलांचं माहिती नाही पण तो नेता येणारच... सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

उन्मेश पाटील यांचं माहिती नाही पण 'हा' आमच्याकडे कमबॅक करणार; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 2:47 PM

भाजपचे नेते, खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. काही वेळा आधी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली. त्यामुळे पाटील ठाकरे गटात येतील आणि जळगावमधून निवडणूक लढवतील, अशी माहिती आहे. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. उन्मेश पाटलांचं माहिती नाही. पण हेमंत गोडसे आमच्याकडे कमबॅक करतील. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार नाही. म्हणून गोडसे आमच्यासोबत येतील. भाजप सर्वेचे कारण दाखवत जास्त जागा पदरात पाडून घेत आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

वंचितसोबतच्या आघाडीवर काय म्हणाल्या?

वंचितसोबतच्या आघाडीवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. वंचितन आमच्यासोबत यावं, असं आम्हाला खूप आधीपासून वाटत होतं आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न केले. जर आम्ही प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान केला नाही. तर मला भाजपच्या लोकांना विचारायचा आहे की अजितदादांचा पाच जागा देऊन काय सन्मान केला?, असं त्या म्हणाल्या आहेत.

शिवतारेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

विजय शिवतारे यांनी आधी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. यावरही सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिलीय. तारे आता जमीन पर उतरले आहेत ,ते शिवसैनिक नाही तर भ्याड सैनिक, कारण शिवसैनिक 10 वेळा शब्द बदलत नाही किंवा दहा वेळा पक्ष बदलत नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना समोरासमोर उभा करून भाजप गलिच्छ राजकारण करत आहे कुटुंबात भाजपने फूट पाडली. लोकांनी अन्याय विरोधाची मशाल हातात घेतली आहे त्यामुळे विजयाची तुतारी नक्की वाजेल, असं त्या म्हणाल्या.

जागावाटपावर काय म्हणाल्या?

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीकडे कुठलेही घोडं अडलं नाही. महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल आहे. मात्र महायुतीमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. महायुतीमध्ये जागावाटप संदर्भात गोंधळ आहे. शिवसेनेची रणनीती तीच महाविकास आघाडीची रणनीती आणि महाविकास आघाडीचे रणनीती तीच शिवसेनेची रणनीती आहे. आम्ही सगळे एक दिलाने काम करत आहोत लोक या वेळेला भाजपला हरवाण्यासाठी मतदान करतील, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.