Uddhav Thackeray: डिलिमिटेशनचा मुद्दा निघताच शिंदे सेनेच्या नेत्याची उद्धव ठाकरेंना भावनिक साद, काश्मीरचा मुद्दा काढत….

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंब्यावरून राज्यात महाविकास आघाडीत महाभारत सुरू झाले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांने उद्धव ठाकरे यांना या बिलाला पाठिंबा देण्यासाठी साद घातली आहे.

Uddhav Thackeray: डिलिमिटेशनचा मुद्दा निघताच शिंदे सेनेच्या नेत्याची उद्धव ठाकरेंना भावनिक साद, काश्मीरचा मुद्दा काढत....
डिलिमिटेशनला पाठिंबा द्या, शिंदे सेनेच्या मंत्र्याची उद्धव ठाकरे यांना साद
| Updated on: Nov 28, 2026 | 12:22 PM

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राज्यातील महाविकास आघाडीत महाभारत सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवरून मोठा गदारोळ उडाला आहे. काँग्रेससह उद्धव सेनेने या बदलत्या भूमिकेवर तोंडसुख घेतले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना या बिलाला पाठिंबा देण्यासाठी साद घातली आहे.

डिलिमिटेशन बिल मंजूर होईल

Loading...

डिलिमिटेशन बिलावर बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी हे बिल मंजूर होईल असे छातीठोकपणे सांगितले. हे विधेयक परवा संसदेत येत आहे. एनडीएमधील सर्व घटक पक्षांमध्ये बोलणे सुरू आहे. इतर पक्षांसोबत बोलणे सुरू आहे. बिल पास व्हावे प्रयत्न आहे. सुप्रिया सुळे देखील आहेत. त्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. सर्वांना फायदा होणार आहे. महिला आरक्षण बिल देखील त्यात आहे, असे शिरसाट म्हणाले.

डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा द्या

उद्धव ठाकरे यांच्या स्थिती बद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही. काश्मीर 307 प्रश्न होता, त्यावेळी देखील त्यांनी भूमिका घेतली आणि पाठिंबा दिला होता. त्यांनी आता देखील पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. उद्धव ठाकरे खासदार कुठे मतदान करतील याची माहिती संजय राऊतकडे आहे, त्यांना सर्व माहीत असते. शरद पवार यांच्यावर टीका करणारे करतील, कुणी काय बोलावे ज्याचे त्याचे प्रश्न आहे. वडेट्टीवार पाठीत खंजीर खुपसणारे म्हणत आहेत. तर सत्तेत त्यांच्यासोबत बसताना दिसले नाही, सत्ता घेताना शरद पवार गोड लागत होते. आता मताशी सहमत नाही म्हणून पाठीत खंजीर खुपसला, असे म्हणत आहात, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

आमच्या मूल्याची चिंता करू नका, देशातील अनेक पक्ष मोदीसोबत आहे. आम्ही एनडीएमधील दोन नंबरचा पक्ष आहे, तुम्ही चिंता करू नका, तुमच्यातील बिल नंतर समोर येईल. राजकारणा काही गोष्टी करावी लागतील, शरद पवार खंबीर आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतील. रोहित पवार रामायण उदाहरण देत आहे, ज्यांच्या खांद्यावर बसून मोठे झाले, त्या शरद पवार बद्दल असे मत कसे असू शकते, असे शिरसाट म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us