AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिवसेनाप्रमुखांनी हे स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं”; शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

उद्धव ठाकरे यांना वेळ असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये जावे दुसऱ्याला शहाणपण शिकू नये तुम्हाला सभा घ्यायला कोणी रोखले आहे, संजय राऊतसारख्या तीनपाट माणसाला पाठवता आणि इथे बसून त्याच्यावर कॉमेंट करत असता

शिवसेनाप्रमुखांनी हे स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं; शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
| Updated on: May 06, 2023 | 11:17 PM
Share

छ. संभाजीनगर : महाडमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यांच्या या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे, भाजप, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या टीकेला आमदार संजय शिरसाठ यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार किती पोचले याची मला कल्पना नाही असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. आम्ही ज्या शिवसेनाप्रमुखाला बघितले होते,

आम्ही त्यांच्यासोबत 38 वर्षे काम केली त्यावेळेस शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्या सामान्य शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार अशी आठवण सांगत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे कधी शिवसैनिक नव्हते मात्र आम्ही ज्या वेळेस फिरत होतो,

शिवसेनेचे काम करत होतो त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे एकच स्वप्न होतं ते म्हणजे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं या गोष्टीचीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना आठवण करून दिली.

मात्र इथे झाले उलटेच इथे पुत्र मुख्यमंत्री बनला आणि पुत्राचा पुत्रही मंत्री बनला हे महाराष्ट्र आणि शिवसेनाप्रमुखांनी हे स्वप्न कधी पाहिलं नव्हतं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला मुख्यमंत्री पदावर बसला नव्हता म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना खाली खेचले आणि शिवसैनिकाला त्या खुर्चीवर बसवले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेमध्ये आज ज्या प्रमाणे सांगितले आहे त्याचप्रमाणे त्यांनी ठाम राहावे एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या किंवा विदेश वाऱ्या करत आहेत ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी करत आहेत असं सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतूकही केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांना तुम्ही मोदींचे नाव घेऊन निवडणुका लढवा मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन निवडणूक लढवतो असे म्हटले होते.

यावर उत्तर देताना संजय शिरसाठ यांनी बोलताना सांगितली की आम्ही शिवसेना प्रमुखांचे नाव विसरू शकत नाहीत, ते आमचे दैवत आहेत आणि आम्ही त्यांचं नाव घेऊनच पुढच्या निवडणुका लढवणार आहोत अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगितले.

कधीतरी फोटोग्राफी केली आणि वर आले आम्ही तसे नाहीत आम्ही 38 वर्षे काम केले आहे आणि आम्ही शिवसेनाप्रमुखांचे नाव घेऊनच निवडणूक लढवणार आहोत आणि तुम्हाला ते वाईट वाटत असेल तर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचे नाव घेऊ नका असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांना वेळ असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये जावे दुसऱ्याला शहाणपण शिकू नये तुम्हाला सभा घ्यायला कोणी रोखले आहे, संजय राऊतसारख्या तीनपाट माणसाला पाठवता आणि इथे बसून त्याच्यावर कॉमेंट करत असता तसेच उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये सभा घेऊन दाखवावी असं थेट आवाहनही संजय शिरसाठ यांनी केले आहे.

कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.