AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्देवी… मुलीला पुण्याला कॉलेजमध्ये सोडलं, घरी जायला निघाले अन्…. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नेमका कसा घडला हा अपघात ?

दुर्देवी... मुलीला पुण्याला कॉलेजमध्ये सोडलं, घरी जायला निघाले अन्.... एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
समृद्धी महामार्गवर भीषण अपघात
| Updated on: Jul 20, 2026 | 1:58 PM
Share

समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्यातील विरुळ गावाजवळ रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मालवाहू वाहनाची कारला मागून जोरदार धडक बसली, आणि त्यामुळे त्या कारने तत्काळ पेट घेतला. आगीच्या ज्वाळा उसळल्या.  कारने अचानक पेट घेतल्याने गदारोळ झाला, मात्र दुर्दैवाने कारमधील चाह जणांचा मृत्यू झाला. तसेच ज्या मालवाहू वाहनाची कारला धडक बसली त्यातीलही एका व्यक्ती मृत झाली. तर अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारमधील चौघांचा होरपळून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गवर इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला होता. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू होती.  विरूळ गावाजवळ मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो डायरेक्ट समोरच्या कारला जाऊन धडकला. ही टक्कर एवढी भीषण होती की कारने तत्काळ पेट घेतला. त्यातील प्रवाशांना खाली उतरण्याची , जीव वाचवण्याचीही संधी मिळाली नाही. आणि दुर्दैवाने होरपळून चौघांचाही मृत्यू झाला. एमबीएला प्रवेश घेतलेल्या मुलीला कॉलेजमध्ये सोडून हे कुटुंब घरी परत जात होतं, मात्र तेव्हाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.  तर मालवाहू वाहनामधील एकानेही या अपघातात जीव गमावला.

राजेश टिपले, त्यांची पत्नी आणि मुलगी असे एकाच कुटुंबातील तिघे मृत्युमुखी पडले. तसेच कार चालक अंकुश राऊत याचाही मृत्यू झाला. टिपले यांच्या मुलीला कॉलेजमध्ये सोडून ते परत येत होते, मात्र तेव्हाच त्याच्या कारला ट्रकने मागून धडक दली. ती एवढी भीषण होती की कारचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळांमुळे कालमधील चौघांचाही जीव गेला.

या अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तर एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होती. अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग पोलीस, पुलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. जखमीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रांजणगाव एमआयडीसीत दुर्दैवी अपघात; चालकाचा मृत्यू

तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील कंपनीमध्ये माल भरल्यानंतर टेम्पोच्या मागील बाजूस पडदा बांधत असताना चालक टेम्पो आणि रॅम्प यांच्या दरम्यान अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये माल भरल्यानंतर टेम्पो चालक वाहनाच्या मागील बाजूस पडदा बांधत होता. याचवेळी तो टेम्पो आणि लोडिंग रॅम्प यांच्या दरम्यान अडकला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे रांजणगाव एमआयडीसी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले