सांगली महामार्गावर भीषण अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या

| Updated on: Feb 08, 2021 | 9:57 PM

या अपघातात मोटार कारसह मालगाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Sangli Highway Accident Five Cars collided with each other)

सांगली महामार्गावर भीषण अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
सांगली अपघात
Follow us on

सांगली : एकामागून एक अशा पाच गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. सांगलीच्या नेर्ले येथील आशियाई महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  (Sangli Highway Accident Five Cars collided with each other)

सांगली अपघात

सांगलीच्या नेर्ले गावाकडून महामार्गावरुन अज्ञात चारचाकी वाहनाने सरळ महामार्गावर प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमार्गे येणार एका कार चालकाने गाडीचा वेग कमी केला. त्यामुळे पाठीमागून अतिवेगात येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे हा अपघात झाला. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.

सांगली अपघात

या अपघातात मोटार कारसह मालगाडीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अनेक गाड्या या कोल्हापूरहून पुण्याला जात होत्या. यात मालगाडी, मोटार कार या गाड्यांचा समावेश आहे.  या अपघातामुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. या अपघातानंतर गस्ती पथकाचे पोलीस शेनेकर आणि त्यांची टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील इतर वाहने मार्गस्थ केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही.

सांगली अपघात

इंदापुरात ऊसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून धडकली

दरम्यान काल पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर नजीक डाळज नंबर-3 येथे हा भीषण अपघात झाला. उसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत पावलेल्यांची नावे गीता अरुण माने, मुकुंद अरुण माने, अरुण बाबुराव माने अशी आहेत. अपघातात ठार झालेल्यांमध्ये आई, वडील आणि मुलांचा समावेश आहे. अपघातात दोन जण जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील मृतदेह काढण्यासाठी क्रेनच्या मदत घ्यावी लागली. (Sangli Highway Accident Five Cars collided with each other)

संबंधित बातम्या : 

ऊसाच्या ट्रॅक्टरला फॉर्च्यून धडकली; एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार

गोकुळ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही, रागात मित्राकडून मित्राच्या गळ्यावर कटरने वार, मित्राला अटक