सांगलीत Modified Bike स्पर्धा पोलिसांनी उधळली, 37 ‘सौंदर्यवती’ ताब्यात

| Updated on: Dec 25, 2020 | 8:07 PM

स्पर्धा पाहण्यास आलेल्या काहीजणांना पोलिसांनी दंडुकाचा प्रसाद दिला (Sangli Police ruined modified bike competition)

सांगलीत Modified Bike स्पर्धा पोलिसांनी उधळली, 37 सौंदर्यवती ताब्यात
Follow us on

सांगली : सांगलीत मॉडीफायड दुचाकी गाड्यांची सौंदर्यस्पर्धा पोलिसांनी उधळली. या स्पर्धेत 100 वाहनं सहभागी झाली होते. या कारवाईत पोलिसांनी 34 सौंदर्यवती गाड्या पकडल्या. पण 71 वाहनचालक गाडीसह पसार झाले. यापैकी 10 स्पर्धकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सांगली पोलिसांच्या या कारवाईची शहरभर चर्चा सुरु आहे (Sangli Police ruined modified bike competition).

सांगलीजवळ असलेल्या सांगलवाडीच्या ग्राउंडवर मॉडीफाय दुचाकीच्या भरवण्यात आलेल्या स्पर्धा पोलिसांनी उधळून लावल्या. या कारवाईत 37 मॉडीफाय गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर 71 वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाले तर 37 वाहने सापडली आहेत (Sangli Police ruined modified bike competition).

सांगली पोलिसांना स्पर्धेतील गाड्या या विना परवाना असल्याची माहिती मिळाली होती. त्याचबरोबर या गाड्यांचा कर्कश आवाज भरपूर होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने स्पर्धेच्या ठिकाणी जावून तब्बल 37 गाड्या ताब्यात घेतल्या तर 71 गाड्या घेऊन तरुण पसार झाले आहेत. या कारवाईत स्पर्धा आयोजकासह 10 ते 12 जणांना ताब्यात घेण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेले बरेच जण कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते सांगलीत स्पर्धसाठी आले होते. तर ही स्पर्धा पाहण्यास आलेल्या काहीजणांना पोलिसांनी दंडुकाचा प्रसाद दिला. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल बागाव यांनी ही कारवाई केली आहे. पसार झालेल्या 71 गाड्यांच्या चालकांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : माझ्याकडे पावडर, दागिने चमकवून देतो, वयोवृद्धांना गंडवणाऱ्या चोरट्याला कारावास