AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगली हादरली, एकाच दिवसात तीन मर्डर, घटनेने उडाला थरकाप

सांगली शहरामध्ये एक तर जतमध्ये दोन ठिकाणी अशा एकाच दिवसात तीन हत्येचे गुन्हे घडल्याने सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

सांगली हादरली, एकाच दिवसात तीन मर्डर, घटनेने उडाला थरकाप
| Edited By: | Updated on: Mar 30, 2026 | 10:58 PM
Share

सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात तीन विविध घटना तीन जणांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत सांगली शहरातील लक्ष्मी मंदिर येथे पाठलाग करून एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. दुसऱ्या भयानक घटनेत जत मधील वळसंग एका महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून आणि तिचे डोके दगडाने ठेचून खून करण्यात आला.तिसऱ्या घटनेत जतच्या बिळूर येथे सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून श्रीधर येलगोंडा याचा हत्या करण्यात आली. या तीन घटनांमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सांगली शहरातील लक्ष्मी मंदिर परिसरात एका गुन्हेगाराचा पाठलाग करुन अन्य गुन्हेगारांनी निर्घृन खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सौरभ पवार असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री सौरभ पवार याचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला. शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ती या दोघांनी त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे . दरम्यान या प्रकरणी शाहीद मुल्ला याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे एखाद्या चित्रपटात घडावी पाठलाग करून खून केल्याची घटना घडल्याने सांगली शहरात खळबळ उडाली आहे.

महिलेच्या चेहऱ्यावर एसिड टाकले, डोके ठेचले

दुसऱ्या घटनेत जत मधील वळसंग येथे एका महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून तसेच तिचे डोके दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वळसंग गावाजवळ भर दुपारी या ३० वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्यात आले आणि तिचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या झाल्याने घबराट पसरली. तिसऱ्या घटनेत जत मधील बिळूर येथे जमीन आणि सामायिक विहिरीच्या वादातून श्रीधर येलगोंडा यांचाही भर दिवसा खून करण्यात आला. यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात तीन खुनांच्या घटना घडल्यामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात