सांगलीतील विद्यार्थ्यांचं मोठं यश, स्वतः तयार केलेला उपग्रह रामेश्वर येथून अवकाशात झेपावला

| Updated on: Feb 08, 2021 | 12:38 AM

सांगली महापालिकेच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह रामेश्वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावला.

सांगलीतील विद्यार्थ्यांचं मोठं यश, स्वतः तयार केलेला उपग्रह रामेश्वर येथून अवकाशात झेपावला
Follow us on

सांगली : सांगली महापालिकेच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह रामेश्वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावला. यानंतर तीन ते पाच तासाच्या अंतराने निर्धारित वेळेत हे सॅटेलाईट पुन्हा पृथ्वीवर परतले. रामेश्वर येथे तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सौदर्याराजन यांच्याहस्ते आणि इस्रोचे माजी संचालक डॉ. ए शिवथानू पिलाई, मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. लिमा रोज मार्टीन आणि इस्रोचे डायरेक्टर पद्मश्री डॉ. मल्लयस्वामी अण्णादुराई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी फौंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि राज्य समनव्यक मनिषा चौधरी यांचीही उपस्थिती होती (Sangli students launch own made Satellite from Rameshwar Telangana).

यावेळी सांगलीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले 100 उपग्रहाचे प्रेक्षपण करण्यात आले. यावेळी देशभरातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी उपस्थित होते. रामेश्वर येथील डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फौंडेशन रामेश्वर यांच्याकडून या पे लोड चॅलेंज 2021 चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते.

सांगली महापालिका शाळातील 10 विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रहसुद्धा मान्यवरांच्या हस्ते अवकाशात सोडण्यात आले. आज रामेश्वर येथून आपण तयार केलेल्या उपग्रहाचे प्रेक्षपण झाल्यानंतर सांगली मिरजेतील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. रामेश्वर येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन, रामेश्वरम आयोजित “स्पेस रिसर्च पे लोड क्युब चॅलेंज 2021” या गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

हेही वाचा :

जपानने बनवला थेट लाकडाचा उपग्रह, थक्क करणारी आहेत वैशिष्ट्ये

2020 मधील ISROची पहिली मोहीम, शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘EOS-01’उपग्रहाचं 7 नोव्हेंबरला प्रक्षेपण

करबुडव्यांनो सावधान! देशात सॅटेलाईटच्या मदतीने बेहिशेबी मालमत्ता उघड

व्हिडीओ पाहा :

Sangli students launch own made Satellite from Rameshwar Telangana