जपानने बनवला थेट लाकडाचा उपग्रह, थक्क करणारी आहेत वैशिष्ट्ये

जपानने बनवला थेट लाकडाचा उपग्रह, थक्क करणारी आहेत वैशिष्ट्ये

जपानच्या म्हणण्यानुसार, या उपग्रहाद्वारे प्रदूषण रोखण्यात मदत होणार आहे. या उपग्रहाला इको फ्रेंडली असंही म्हटलं गेलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Dec 27, 2020 | 6:37 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) जीवघेण्या संसर्गामुळे जगात प्रत्येक क्षेत्रात मंदी आल्याचं पाहायला मिळालं. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, संस्था कोरोनाच्या संकटात बंद पडल्या. अशात जगाच्या अंतराळ यंत्रणांनी यंदा अंतराळ विश्वामध्ये मोठा पराक्रम करून दाखवला आहे. अलीकडे जपानने (japan) लाकडी उपग्रह (wooden satellite) प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. लाकडापासून उपग्रह तयार करणं ही खरंतर एक आश्चर्यकारक घटना आहे. जपानच्या म्हणण्यानुसार, या उपग्रहाद्वारे प्रदूषण रोखण्यात मदत होणार आहे. या उपग्रहाला इको फ्रेंडली असंही म्हटलं गेलं आहे. 2023 मध्ये हा उपग्रह आणण्याचे नियोजन करण्यात आलं असून हा बनवण्यामागील हेतू काय आहे जाणून घेऊयात. (japan will launch new wooden satellite in 2023)

का बनवला लाकडी उपग्रह ?

मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधील दोन गट म्हणजेच क्योटो विद्यापीठ आणि सुमीटोमो फॉरेस्ट्री हे अंतराळात झाडं आणि लाकडी वस्तूंच्या विकासावर संशोधन करत आहेत. जिथे लाकडी उपग्रहांद्वारे प्रदूषण कमी करणं हे महत्त्वाचं उदिष्ट्ये ठेवण्यात आलं आहे. जपान नेहमीच पर्यावरणाबद्दल संवेदनशील आहे. जेव्हा लाकडापासून बनलेला उपग्रह अक्षावरून बाजूला जातो किंवा पृथ्वीवर परत येतो तेव्हा पृथ्वीच्या वातावरणाला स्पर्श होताच तो नष्ट होतो. त्यामुळे याकून कोणतेही प्रदूषण होत नाही आणि पर्यावरणाची हानी होत नाही.

2023 मध्ये उपग्रह आणण्याची घोषणा

जपानमधील दोन गट, क्योटो युनिव्हर्सिटी आणि सुमीटोमो फॉरेस्ट्री, 2023 मध्ये तीन वर्षांनंतर म्हणजेच उपग्रह आणण्याची योजना आखत आहेत. या दोन्ही गटाने नुकतीच संयुक्तपणे ही घोषणा केली आहे. याचा पुढचा टप्पा 2024 मध्ये असणार आहे जिथे दोन्ही जपानी गट स्पेस सेंटरमध्ये असे अनेक उपग्रह तयार करतील. असं झाल्यास, लाकडापासून बनवलेले उपग्रह प्रक्षेपित करणारा जपान जगातील पहिला देश असणार आहे.

जपानने उचललेलं हे पाऊल प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. यूएस स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 6 हजार टन भंगार अवकाशात आहे. अनेक मानवनिर्मित गोष्टी अंतराळात जमा झाल्या आहेत. ज्यामध्ये खराब आणि जुन्या उपग्रहांचा जंक आहे. जे वर्षानुवर्षे फिरत आहे. ज्याचा प्रभाव कार्यरत उपग्रहांवर होऊ शकतो. त्यामुळे जपानने हा नवा विक्रम केला आहे. (japan will launch new wooden satellite in 2023)

इतर बातम्या – 

इराणमध्ये भयावह वातावरण, प्रचंड बर्फवृष्टी आणि वादळ, दहा गिर्यारोहकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

संडे स्पेशल- दुसऱ्या देशात घुसून ‘मोसाद’ काम कशी फत्ते करते?

(japan will launch new wooden satellite in 2023)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें