इराणमध्ये भयावह वातावरण, प्रचंड बर्फवृष्टी आणि वादळ, दहा गिर्यारोहकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

इराणची (Iran) राजधानी असलेल्या तेहरान (Tehran) शहराच्या उत्तरेकडील डोंगररांगांमध्ये जवळपास 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे (ten climbers death after snowfall in Iran)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:43 PM, 27 Dec 2020
इराणमध्ये भयावह वातावरण, प्रचंड बर्फवृष्टी आणि वादळ, दहा गिर्यारोहकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

तेहरान : इराणची (Iran) राजधानी असलेल्या तेहरान (Tehran) शहराच्या उत्तरेकडील डोंगररांगांमध्ये जवळपास 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. एकीकळे कोरोना संकट सुरु असताना इराणमध्ये वादळ आणि बर्फवृष्टीने प्रचंड थैमान घातलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून इराणमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. या बर्फवृष्टीमुळे इराणमधील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत (ten climbers death after snowfall in Iran).

इराणची सरकारी मीडिया IRIB ने दिलेल्या माहितीनुासर, गेल्या शुक्रवारपासून अनेक गिर्यारोहक बेपत्ता आहेत. यादरम्यान दोन जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली. त्यानंतर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर नऊ गिर्यारोहकांचा पर्वतावरच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. इराणच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख मेहदी वालीपॉर यांनी याबाबत माहिती दिली. अजूनही सात गिर्यारोहक बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली (ten climbers death after snowfall in Iran).

समुद्रात बोट उलटली

दुसरीकडे इराणमध्येच समुद्रात बोट उलटल्याने सात क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सध्या सुरु आहे. इराणच्या सागरी सीमेचे संरक्षण संघटनेचे उपप्रमुख इस्माईल मक्कीझादेह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आम्ही आमच्या सर्व सुविधा आणि सुरक्षा दलांचा वापर करुन बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे काम करत आहोत. या संदर्भात आम्ही ओमान, संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानच्या बचाव पथकांनाही माहिती दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : एकदाच 50 हजार रुपये लावा, दहा वर्षात लाखो कमवा