150 कोटींचा व्यवहार, मुंबईतील हॉटेलात…राऊतांच्या आरोपाने खळबळ. संभाजीनगर, रायगडमध्ये धक्का बसताच गंभीर दावा!

मुख उमेदवारांना किमान 25 कोटी रुपये दिले आहेत. काल मुंबईतील सॉफीटेल या हॉटेलमध्ये एक व्यवहार झाला. त्यानंतर कोकणातील रायगडमध्ये माघार घेण्यात आली. संभाजीनगरात आमच्या एका उमेदवाराने माघार घेतली. तिथेही साधारण त्याच पद्धतीने व्यवहार झाले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

150 कोटींचा व्यवहार, मुंबईतील हॉटेलात...राऊतांच्या आरोपाने खळबळ. संभाजीनगर, रायगडमध्ये धक्का बसताच गंभीर दावा!
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2026 | 5:57 PM

Vidhan Parishad Election 2026 राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. या दिवशी बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले जात होते. अनेक बडे नेते बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यात काही ठिकाणी यश आले आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी धक्कादायकरित्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. या सर्व घडमोडीनंतर आता ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर खळबळ उडाली आहे. त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.

अर्ज शेवटपर्यंत टिकायला हवे होते?

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. मी आधीपासून सांगत होतो की आपल्याकडे संख्याबळ नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाने निवडणुका बिनविरोध होऊ नयेत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदावरी अर्ज शेवटपर्यंत टिकायला हवे होते, अशी भावना राऊत यांनी व्यक्त केली.

जवळपास दीडशे कोटी रुपये आज खर्च

तसे, निवडणुका बिनविरोधच करायच्या या सरकारपक्षाच्या अट्टहासापाई अनेक मार्गांचा अवलंब झाला. त्यात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या उमेवादारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न काही ठिकाणी यशस्वी झाला. आज दिवसभरात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आज जवळपास दीडशे कोटी रुपये आज खर्च करण्यात आले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

प्रमुख उमेदवारांना 25 कोटी देण्यात आले

प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी रुपये दिले आहेत. काल मुंबईतील सॉफीटेल या हॉटेलमध्ये एक व्यवहार झाला. त्यानंतर कोकणातील रायगडमध्ये माघार घेण्यात आली. संभाजीनगरात आमच्या एका उमेदवाराने माघार घेतली. तिथेही साधारण त्याच पद्धतीने व्यवहार झाले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, शिवसेनेने कोकणातील बाळा माने यांची हकालपट्टी केली. संभाजीनगरात देवयाणी डोणगावकर, कृष्णा डोणगाकर यांची हकालपट्टी केली आहे. हे आमच्याकडे चालणार नाही. पक्षप्रमुखांची, पक्षाची परवानगी न घेता, कोणी माघार कसे घेऊ शकतात. ज्यांनी व्यवहार केले त्यांनीच आम्हाला या व्यवहारांबाबत सांगितले, असंही राऊत म्हणाले. राज्य आणि देश नासवण्याचा हा प्रकार खूप घातक असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली.

Follow Us