ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले…

उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याचा फक्त चर्चा नाही तर ते एकत्र येणारच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्याशी होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.

ठाकरे बंधू एकत्र येणार, पडदा कधी उघडणार? संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले...
sanjay raut
| Updated on: May 25, 2025 | 12:00 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाकडून जाहीर झाल्या आहेत. त्या सरकारकडून जाहीर झालेल्या नाहीत. सरकारच्या मनात असते, तर अजून चार वर्ष या निवडणुका रखडवल्या असत्या. महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा प्रयत्नात आहे. त्याबाबत स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र बसवून निर्णय घ्यावा, असे संजय राऊत यांनी म्हटले. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा दावा पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केला.

छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांचा चोरलेला पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. यामुळे भुजबळ यांनी सांगितले की, मला मंत्री करण्यामागे अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे योगदान आहे. त्यांनी अजित पवार यांचे नाव का घेतले नाही? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ आता भाजपमध्येच आहे. ते अमित शाह यांच्या पक्षात आहेत. फक्त तांत्रिक दृष्ट्या ते दुसऱ्या गटात आहे. त्यांनी अमित शाह यांचे नेतृत्व मानले आहे. ज्या अमित शाह यांनी शिवसेनेचे तुकडे केले, आता त्यांना मुंबई आणि महाराष्ट्र तोडायचा आहे, त्या पक्षात भुजबळ आहेत. हे भुजबळ कधीकाळी मराठी माणसासाठी आणि सीमा प्रश्नासाठी रस्तावर उतरले होते, असे राऊत यांनी म्हटले.

ठाकरे बंधू एकत्र येणारच…

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा चर्चा नाही. मी सांगत आहे ना, ठाकरे बंधू एकत्र येणार आहे. यासंदर्भात पडदा उघडायला वेळ आहे. तो योग्य वेळी उघडला जाईल. युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्यासोबत होईल. उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक भूमिका घेतली गेली आहे. महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात भावना असेल, तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही, अशी भूमिका उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मुंबई ही मराठी माणसाचे हृदय आहे. या मुंबईसाठी 106 मराठी माणसांनी हुतात्मे दिले आहे. मुंबई गिळण्याचे काम नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस करणार आहेत. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये, यासाठी ते प्रयत्न करत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.