बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल संजय राऊत यांचा मोठा खुलासा, म्हणाले, शरद पवार..
संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. आम्ही भाजपाला घाबरत नसल्याचेही त्यांनी म्हटले. बारामतीमधील पोटनिवडणुकीच्या विषयावर बोलताना संजय राऊत दिसले. यादरम्यान त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानाचे थेटपणे समर्थन केले.

संजय राऊत यांनी नुकताच जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या पक्षाने पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुक लढलीच होती ना. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर. लोकशाहीत जर कोणी निवडणूक लढत असेल तर दबाव का आणायचा? शरद पवार यांच्या विचारांशी मी सहमत आहे. काँग्रेसच्या मदतीने त्यावेळी ते पिंपरी चिंचवडची निवडणूक लढते होते. हा अलिकडचाच इतिहास आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि रविंद्र चव्हाण काय स्वातंत्र्यसैनानी आहेत? ते समजून सांगायला जाण्याकरिता. अहो धमक्या दिल्या जातात. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर किती आरोप आहेत. हे धमक्या द्यायला जातात. हे फाईल घेऊन जातात. लढू नका नाही तर नोटीस पाठू कारखान्याला म्हणून हे लोक जातात. जे या धमक्यांना घाबरतात ते मागे जातात. सध्याच्या राजकारणात सहज काही मिळत नसल्याचेही राऊतांनी म्हटले.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्हाला संघर्ष करावा लागतो. नाही तर तुम्हाला भाजपाचे गुलाम म्हणून जगावे लागते. आम्हाला हे मान्य नाही, आम्ही भाजपाला घाबरत नाही, भाजपाच्या दहशतीला घाबरत नाहीत. कशाकरिता घाबरायचे देशात लोकशाही आहे. सुनेत्रा पवार यांना कोणी महाविकास आघाडीतून पाठिंबा दिला असे मला वाटत नाही.
आमच्या सदभावना त्या कुटुंबाविषयी आहेत. अजित पवार यांच्याविषयी आहेत. शरद पवार यांनी काैटुंबिक कारणाने त्याठिकाणी आपला उमेदवार टाकला नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सदभावना व्यक्त केल्या. पण शेवटी काँग्रेस हा महाविकास आघाडीतील स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची भूमिका लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे.
पण त्यांनी उमेदवार देताना एक अट टाकली. जर मागे घेण्याची तुमची विनंती असेल तर आम्ही स्विकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाताचा एफआयआर गुन्हा राज्यात दाखल करा. आकाश मोरे हे या क्षणी काँग्रेसचे उमेदवार आहेत. एनसीपी या निवडणुकीपासून दूर आहे. शिवसेना जरी या निवडणुकीपासून आज दूर असली तरीही शेवटी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक आहेच ना.